शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सिंधुदुर्गातील रखडलेला ताज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

By अनंत खं.जाधव | Updated: September 25, 2023 16:04 IST

सावंतवाडी : जमिन संपादन आणि नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आल्यामुळे तब्बल २५ वर्षे रखडलेला वेळागर येथील ताज ...

सावंतवाडी : जमिन संपादन आणि नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आल्यामुळे तब्बल २५ वर्षे रखडलेला वेळागर येथील ताज ग्रुपचा पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प मार्गी लागणार आहे. त्यामुळे त्यांचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीला होणार आहे, असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. दरम्यान मोचेमाड येथील पंचतारांकित हॉटेलला पाणी उपलब्ध झाल्यास महिनाभरात हा सुध्दा प्रकल्प चालू होईल, त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प स्थानिकांना रोजगार देणारे मॉडेल ठरेल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. ताज व मोचेमाड येथील पंचतारांकित प्रकल्पाबाबत रविवारी केसरकर यांनी माजी आमदार शंकर कांबळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यानंतर ही माहिती दिली. केसरकर म्हणाले, वेळागर येथील ताज प्रकल्पाचे काम मागील पंचवीस वर्षापासून होऊ शकले नाही. या प्रकल्पाच्या जमीन संपादन व नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आला असून सध्या शंभर एकर जमिनीची मोजणी सुरू आहे. ताज ग्रुप, पर्यटन महामंडळ व स्थानिक यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना याबाबत नुकसान भरपाई योग्य प्रकारे दिली जाणार आहे, तसेच हॉटेल प्रकल्पामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. इच्छुकांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या जमिनीच्या क्षेत्रामध्ये काही घरांच्या भिंती व मंदिरे येत आहेत. त्याबाबतही आज निर्णय घेण्यात आला. महिला बचत गटांना देखील या प्रकल्पामुळे संधी मिळेल स्थानिकांना रोजगार देणारा प्रकल्प म्हणून मॉडेल या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून होईल, असे त्यांनी सांगितले.मोचेमाड येथील पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून जवळपास शंभर रूम्स उपलब्ध आहेत. पाण्याअभावी त्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला नाही. मात्र पाण्याची लाईन लवकरच पोहोचली तर एका महिनाभरामध्ये या ठिकाणी हॉटेल सुरू होईल. आपल्या मतदारसंघात हॉटेल प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त करून महिला बचत गटांनाही संधी देण्यात येणार असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर