शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नव्या पर्वाची सुरुवात, पर्यटकांना मिळणार पाण्याखालच्या स्वर्गाची अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:44 IST

पर्यटक, अभ्यासक, साहसी जलप्रेमींसाठी पर्वणी 

संदीप बोडवेमालवण: मागील दहा पंधरा वर्षात सी वर्ल्ड, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचांची सातत्याने चर्चा करण्यात येत होती. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. २०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना आहे. आता याच ठिकाणी निवृत्त युद्धनौकेचे पाण्याखाली संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ बेटा मध्ये रूपांतर करण्यात येणार असल्यामुळे येथील पर्यटन खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे ठरणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता लागून राहिली आहे.

प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळला

  • माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पाणबुडी आणि निवृत्त युद्धनौकेचा पर्यटनासाठी वापर करण्याची योजना आखण्यात आली होती. २०१७ मध्ये भारतीय नौदलाची शान असलेली शत्रुराष्ट्राला धडकी भरविणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका ग्रांट ओल्ड लेडी म्हणजेच आयएनएस विराट ला सिंधुदुर्गच्या समुद्रात अंडरवाटर म्युझियम अँड आर्टिफिशियल साठी आणण्याचे ठरले होते मात्र फडणवीस सरकार बदलल्या नंतर २०२० मध्ये हा प्रकल्प बारगळला आणि विराट युद्ध नौका भंगारात गेली. याच दरम्यान निवती समुद्रात पर्यटनासाठी पाणबुडी आणण्याचेही ठरले हाही प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळला आहे.
  • हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याचीही चर्चा रंगली होती. यावर विरोधकांकडून राज्य शासनावर सातत्याने टिका करण्यात आली होती. मात्र आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गुलदार युद्धनौकेच्या सागरी संग्रहालया बरोबरच पाणबुडी प्रकल्पाद्वारे पर्यटकांना त्याठिकाणी नेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पाणबुडी प्रकल्पही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लवकरच हाती घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

जल पर्यटनाच्या दर्जा उंचावणार..मालवण आणि वेंगुर्ला या दोन तालुक्यांपुरता विचार न करता संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटनातला एक उच्च दर्जा मिळवून देणारे पाणबुडी आणि युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय हे प्रकल्प आता दृष्टीक्षेपत आले आहेत. या प्रकल्पांसाठी अनेक वर्ष मालवण आणि वेंगुर्ला येथील पर्यटन व्यवसायिकांनी संघर्ष केला आहे. नुकताच गुलदारर युद्धनौकेच्या पर्यटन प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमातून सिंधुदुर्ग वासियांच्या पारड्यात दुहेरी आनंद मिळाला आहे. भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ मुंबई मंत्रालयात रोवली गेली असली तरी त्याचे थेट पडसाद सिंधुदुर्गावासियांमध्ये उमटले आहेत. 

सिंधुदुर्गासाठी सुवर्ण क्षण..सिंधुदुर्गाच्या दृष्टीने सुवर्ण अक्षरांनी हा दिवस लिहीला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर घडलेल्या आजवरांच्या अनेक स्थित्यांतरामधील गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गाचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे नोंदविले गेले आहे.

डॉ. सारंग कुलकर्णी यांचे मोठे योगदान..गुलदार नौका तिच्या घडाडीच्या व कार्यक्षमतेच्या आठवणींसह आता ती पर्यटकांना, अभ्यासकांना व साहसी जलप्रेमींना भेटण्यासाठी सज्ज होतेय. या संग्रहालयाच दर्शन तितकच खास असणार आहे. स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या सहाय्याने पर्यटक थेट सागर तळाशी जाऊन या युद्धनौकेचा अनुभव घेणार आहेत. इथे नियम होणारे प्रवाळ, समुद्री गवत, रंगेबीरंगी मासे आणि जैवविविधतेने परिपूर्ण असे समुद्रातील जग अनुमवू शकता. हे सर्व पाहण्यासाठी स्थानिक स्कुबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून काम करतील तर तरुणांसाठी डाइव्ह मास्टर्स हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. एमटीडीसीचे तत्कालीन जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांचे या कामी मोठे योगदान राहिले आहे.