शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 16, 2022 18:27 IST

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.

सिंधुदुर्ग : शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ओळख असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी वर्षानुवर्ष धोक्यात येत चालली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.मागील दोन वर्षांपासून माजी खासदार संभाजीराजेंनी याबाबत पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. संभाजीराजेंनी गतवर्षी विजयदुर्ग किल्ल्याच्या ढासळत चाललेल्या तंटबंदीची पाहणी केली होती. तसेच या समस्येकडे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, शासनाच्या पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन होणारी पडझड रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.शासनाला जाग कधी येणारहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक किल्ल्यांना अखेरची घरघर लागली आहे. किल्ल्यांचा इतिहास लुप्त झाल्यानंतर सरकारला जाग येणार का? अशी विचारणा आता शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींमधून होत आहे.संभाजीराजेंनी पुन्हा लक्ष वेधलेकोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर विशाळगडावरही बुरुज ढासळल्याने दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या दोन किल्ल्यांची पडझड मनाला वेदना देत असतानाच मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि शिवरायांनी पुर्नबांधणी करून घेतलेला विजयदुर्गही आता संकटात सापडला आहे. आता या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी गडाची तटबंदीला फुगवटा आल्याने केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात २०२० मध्येच पत्रव्यवहार करून डागडूजी करण्यासाठी विनंती केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड