शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली; हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:05 IST

दोन हत्तींची भेट ही धोक्याची घंटा?

दोडामार्ग : मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात दाखल झाला. या अनपेक्षित पुनरागमनामुळे हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. एकीकडे गणेश टस्कर व दुसरीकडे ओंकार हत्ती दाखल झाल्याने वनविभागाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.अवघ्या सहा दिवसांपूर्वी तालुक्यातील बांबर्डे व घाटीवडे परिसरात गणेश टस्कर व मादी पिल्लूचे आगमन झाले. त्यांनी परिसरातील केळी, सुपारी, नारळ बागायतींचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला हे संकट घोंगावत असताना दुसऱ्या बाजूने ओंकार हत्ती तालुक्यात माघारी परतला आहे. तीन महिन्यांपूर्वी कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती गोवा राज्यात दाखल झाला.त्यानंतर लगतच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात या हत्तीने थैमान घातले. एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून म्हशीवरही हल्ला केला व तिला ठार केल्याची घटना घडली होती. याखेरीज एप्रिल महिन्यात मोर्ले गावातील एका शेतकऱ्याचा या हत्तीने पायदळी तुडवून बळी घेतला होता. त्यामुळे हा हत्ती पकडून न्यावा, अशी मागणी तालुक्यातून होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे प्रयत्नही सुरू झाले.ओंकारला पाठवायचे कुठे?सावंतवाडी तालुक्यात या हत्तीचा उच्छाद सुरू असताना हत्तीला पकडून वनतारात पाठविण्याची तयारीही वनविभागाने केली. मात्र, त्याला काहींनी आक्षेप घेत तो तळकट वनक्षेत्रात पाठविण्याची मागणी केली. या मागणीला तळकट पंचक्रोशीतून जबर विरोध झाला व हत्ती या परिसरात नको, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे या हत्तीला नेमके पाठवायचे कुठे? असा यक्षप्रश्नच वनविभागासमोर उभा राहिला.

ओंकारला पिटाळताना ग्रामस्थांची धांदल !दोडामार्ग तालुक्यातून ओंकार हत्ती निघून गेल्याने येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास या हत्तीचे डोंगरपाल मार्गे कळणे परिसरात पुनरागमन झाले. हत्ती आल्याची माहिती स्थानिकांना समजताच त्याला पिटाळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न ग्रामस्थांनी केला. मात्र, हत्ती आपल्या मस्तीत व जोशात ग्रामस्थांच्या दिशेनेच चालत येऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी जिवाच्या भीतीने माघारी फिरणे पसंत केले.

दोन हत्तींची भेट ही धोक्याची घंटा?तालुक्यात सध्या ओंकार व गणेश हत्ती असल्याने ते एकत्र आल्यास त्यांच्या द्वंद्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात ग्रामस्थ किंवा शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. त्यामुळे वन विभागाने आक्रमक बनलेल्या ओंकार हत्तीला पकडावे. तसेच, तालुक्यात असलेल्या गणेशसह दुसऱ्या हत्तीला पिटाळून लावावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Onkar Elephant's Return to Sindhudurg: Villagers and Forest Department Anxious

Web Summary : Elephant Onkar re-entered Dodamarg, creating panic. Already dealing with Ganesh Tusker, the forest department faces increased challenges. Villagers demand action to prevent conflicts and ensure safety after past attacks and fatalities.