शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काजू बी दरावरून उद्भवलेला वाद अखेर क्षमला, दीपक केसरकरांची मध्यस्थी

By अनंत खं.जाधव | Updated: April 13, 2024 13:11 IST

सावंतवाडी : काजूदरावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून 120 रूपये काजू बी खरेदी तसेच शासनाचे दहा रुपयांचे अनुदान ...

सावंतवाडी : काजूदरावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून 120 रूपये काजू बी खरेदी तसेच शासनाचे दहा रुपयांचे अनुदान असे मिळून  130 रुपये दर काजू बागायतदारांना देण्यात येणार आहे तसा निर्णय घेण्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत उपस्थित होते.सिंधुदुर्गातील काजू बी ला स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर 197 रुपये दर मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाच्या वतीने लावून देण्यात आली होती. काही वर्ष काजू बिला आवश्यक दर मिळत नसल्याने ही मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने शेतकरी गेले कित्येक दिवस नाराज होते त्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती दराबाबतचा निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यासाठी केसरकर यांनी पुढाकार घेतला होता. शासनाकडूनही काजू बी ला दहा रुपये दरामागे अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र या संदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी फळबागायतदार संघामध्ये नाराजी  होती. शेतकरी व फळबागायतदार संघ व कारखानदार यांची बैठक मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत बोलावले होते या बैठकीमध्ये काजू बागायतदार यांची नाराजी दूर करत त्यांना शासनाचे अनुदान पकडून 130 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले.यासंदर्भात केसरकर म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करताना बाजारपेठेत 110 रुपये दर असलेला काजू 115 रुपये तर 115 रुपये दर असलेला काजू 120 रुपये आले विकत घेण्याचे मान्य केले या दरामागे शासनाकडून मिळण्यात येणारे दहा रुपयाचे अनुदानही देण्यात येणार आहे त्यामुळे 115 रुपयाच्या रुपयांच्या काजूला 120 रुपये तर 120 रुपयाच्या काजुला 130 रुपये दर मिळणार आहे हा दर उद्यापासून काजू बागायतदारांना देण्यात येईल तर शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अनुदान आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल असे स्पष्ट केले. या बैठकीला कारखानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ लेकर, बिपिन वरस्कर, सुधीर झाटये, बापू पोकळे, परशुराम वारंग, दीपक ठाकूर, सूर्यकांत गवस, सिद्धेश शिरोडकर, सुरेश नेरुळकर, विनिता शिरोडकर तर बागायदारांमध्ये संजय देसाई, राकेश धरणे, आकाश नरसुले, निलेश सावंत, अभिलाष देसाई, प्रदीप सावंत, जगदेव गवस, घनश्याम नाईक, जनार्दन नाईक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर