शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्याची नाराजी भोवली, सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 22:40 IST

नवीन मुख्याधिकारी सागर साळुंखे

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे हे  सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळणार आहेत.या बदलीचे आदेश गुरूवारी निघाले असून जावडेकर यांना अद्याप पर्यत कुठेही नेमणूक देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्याधिकारी जावडेकर यांना पालकमंत्र्याची नाराजी भोवल्याची चर्चा सध्या जोर धरत असून त्यामुळेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या कारणातून वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या विरोधात सर्वांचीच मोठी नाराजी होती विशेषता घरपट्टी वाढीवरून तर त्यांना सर्वच पक्षांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.त्याशिवाय भ्रमणध्वनी न उचलणे नागरिकांना कुणाला वेळ न देणे अशा अनेक तक्रारी त्यांच्याबाबत करण्यात आल्या होत्या विशेषता सावंतवाडी मोती तलाव तील गाळ काढण्या बाबत गेले अनेक दिवस स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण आग्रही असताना काम सुरू करण्यात आले नव्हते त्यामुळे ते मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराज  होते.तसेच आठवडा बाजारावरून ही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जावडेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे जावडेकर यांची लवकरच बदली होणार हे निश्चित मानले जात होते. त्यातच आज नगरविकास विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश काढले असून ते सावंतवाडी नगरपालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत.यात सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांची वर्णी लागली आहे तर जावडेकर यांना अद्याप पर्यंत कुठेच पदस्थापना दिली गेली नाही.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी