शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला ही महालात प्रवेश करत असल्याचा भास; कारागृहाला राजेशाही साज

By अनंत खं.जाधव | Updated: December 31, 2023 20:21 IST

सावंतवाडीतील संस्थानकालीन कारागृहाला राजेशाही साज : कारागृह अधीक्षकांची संकल्पना

सावंतवाडी : सावंतवाडीतील संस्थानकालीन कारागृहाचे  रूपडे पालटले जात असून सातारा कारागृहाच्या धर्तीवर सावंतवाडी कारागृहाच्या  प्रवेशद्वाराला राजेशाही साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराकडे बघितल्यानंतर एखाद्या आरोपीला ही महालात प्रवेश करत असल्याचा भास होतो.हे प्रवेशद्वार कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे बनविण्यात आले असून आठवड्यापूर्वीच कारागृहाला बसविण्यात आला आहे.

सावंतवाडी कारागृहाची  ओळख ही संस्थानकालीन कारागृह म्हणून आहे. या कारागृहाची आतील रचना पूर्णपणे संस्थानकालीन असून आज ही कारागृहाची विद्युत सेवा किंवा पाण्याच्या पाईपलाईन विहीर आदि संस्थानकालीनच आहेत.मात्र या कारागृहाचे प्रवेशद्वार खराब झाले होते.तसेच आतील काहि वस्तू ही खराब झाल्या आहेत त्यामुळे याची डागडुजी व्हावी यासाठी कारागृह प्रशासन सतत पाठपुरावा करत होता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून आलिकडेच या  कारागृहाचा दरवाजा बदलण्यात आला आहे या साठी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते.त्या नंतर या कामाला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर स्वता कारागृह अधीक्षक संदिप एकशिंगे यांनी पुढाकार घेत दरवाज्याची कलाकुसर कशी असावी याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली तसे अंदाजपत्रक ही तयार करून घेतले यासाठी सात लाख रूपयांचा निधी ही मंजूर झाला होता.त्यात हे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.सातारा येथील कारागृहाला ज्या प्रमाणे प्रवेशद्वार आहे तसेच प्रवेशद्वार तयार करण्यात यावे असे सुचविण्यात आल्यानंतर कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील कारागिरानी हे प्रवेशद्वार तयार केले असून आलिकडेच हे कारागृहाला बसविण्यात आले आहे.कारागृह शहरांच्या दर्शनी भागात असल्याने या कारागृहाकडेच सगळ्यांच्या नजरा जात असतात.

एखाद्या आरोपीला ही कारागृहात प्रवेश करतना  एखाद्या महालात प्रवेश करत असल्याचा भास होतो.या आकर्षक प्रवेशद्वारा मुळे संस्थानकालीन कारागृहाचे रूपडे ही पालटून गेले आहे. याबाबत कारागृह अधीक्षक संदिप एकशिंगे यांना विचारले असता कारागृहाचा दरवाजा खराब झाला होता.नवीन दरवाजा हा संस्थानकालीन कारागृहाला शोभून दिसेल असा असला पाहिजे म्हणूनच मी या कारागृहाचा दरवाजा हा सातारा कारागृहाच्या धर्तीवर बनविण्याचा निर्णय घेतला त्याला जिल्हाधिकारी यांनी साथ दिली तसेच हा दरवाजा आकेरी येथे बनविण्यात आल्याचे एकशिंगे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गArrestअटक