शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मंत्री केसरकरांविरोधातील ठाकरे गटाचे 'एप्रिल फुल आंदोलन' योग्यच - राजन तेली 

By अनंत खं.जाधव | Updated: April 4, 2023 18:30 IST

आश्वासने देवून लोकांची फसवूणक होत असेल तर आंदोलने होणारच

सावंतवाडी : लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. समोरचा चुकत असेल तर त्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे गप्प बसून चालणार नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने केलेले आंदोलन योग्यच आहे असे म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या एप्रिल फुल आंदोलनाचे समर्थन केले.त्याचवेळी त्यांनी सावंतवाडीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे असे आवाहन ही केले आहे. भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास अभियानाची सुरूवात करत असून जिल्हा परिषद मतदार संघनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत त्यांची माहिती तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, महेश धुरी, आनंद नेवगी, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत, असे मंत्री दीपक केसरकर रोज सांगतात. मग त्या मैत्रीपुर्ण संबंधाचा फायदा उठवून मतदार संघातील लोकांना दिलेली आश्वासने आणि प्रलंबित प्रश्न तरी किमान सोडवा, यासाठी तुम्हाला अडविले कोणी? मी जाहीर केल्या प्रमाणे फाऊंटनचा प्रकल्प हा सावंतवाडीत घेऊन येणारच असे आश्वासन तेली यांनी दिले. या प्रकल्पात अनेकजण खो घालत आहेत पण आता गप्प बसणार नाही प्रकल्प आणणारच असा टोला मंत्री केसरकर यांचे नाव न घेता लगावला.आश्वासने देवून लोकांची फसवूणक होत असेल तर आंदोलने होणारच. त्यामुळे विकास करताना सर्वाना विश्वासात घेणे गरजेचे आहे. डी. एड आंदोलन करणार्‍या उमेदवारांकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, अशी ओरड आहे. याबाबत त्यांना विचारले असता सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आहे. त्यामुळे वेगळे निकष लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां सह पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. या प्रश्नात मंत्री म्हणून केसरकरांनी तात्काळ लक्ष घालून त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही तेली म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली