शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद झाला आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल, संजू परबांची केसरकरांवर टीका

By अनंत खं.जाधव | Updated: March 10, 2023 15:54 IST

..अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल

सावंतवाडी : एका दिवसाच्या आठवडा बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार म्हणून ओरड मारणाऱ्या मंत्री केसरकर यांनी पंधरा वर्षांत किती रोजगार दिले? दहशतवादाचा डोलारा पिटणारे आता सौंदर्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत अशी जोरदार टिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. तसेच मोती तलावाकाठी असलेला बाजार हलविल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सत्यवान बादेकर उपस्थित होते.परब म्हणाले, मंत्री केसकर यांनी अलीकडेच आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्याबाबत आपण ठाम असल्याचे जाहीर केले होते. मात्र जनतेला फसवण्याचे सोडून द्यावे, जनता तुम्हाला कंटाळली आहे. एवढे दिवस दहशतवाद करून राजकारण करणाऱ्या केसरकर यांनी आता मोती तलावाच्या सौंदर्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसाच्या आठवड्या बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही ज्यावेळी आठवडा बाजार भरतो त्यानंतर ताबडतोब पालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अस्वच्छता ही तिथे होत नाही. पूर्वी ज्या ठिकाणी  बाजार भरत होता तेथे महिला वर्गांना होणारा त्रास त्यांच्या बाबतीत होणारे गैरप्रकार व अन्य गोष्टींचा विचार करून हा आठवडा बाजार तलावाच्या काठी भरवण्यात आला. गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारची तक्रार न येता हा आठवडा बाजार येथे सुरळीतपणे सुरू आहे. व्यापारी वर्ग नागरिकांनाही हा बाजार योग्य आणि सोयीचा वाटतो. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी जनतेला दिलेली आश्वासने आणि रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतच बोलावे उगाच आठवड्या बाजारासारख्या विषयावर बोलू नये.आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना विश्वासात घेऊनच त्यांच्याशी चर्चा करून आठवडा बाजार तलावा काटे भरवण्याबाबत निर्णय घेतला होता. तसा ठरावाही मासिक बैठकीमध्ये घेतला आहे. सद्यस्थितीत हा आठवडा बाजार होळीचा खुंठ येथे हलवण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र तेथील जागेचा विचार करता तेथे असणारी स्वच्छतागृहांची वानवा तसेच मुख्य बाजारापासून ही जागा दूर असल्याने गैरसोय होणार आहे. त्यामुळे तलावाकाठील आठवडा बाजार दुसरीकडे हलवताना आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अन्यथा त्याला भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर