शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहावी प्रश्नपत्रिका मोठ्या अक्षरांची--दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सोईचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:09 IST

आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती शिक्षण मंडळाने फेटाळून लावली होती.

ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थिनी श्रुती पाटील हिच्या लढ्याला अखेर यश

वेंगुर्ला : इयत्ता दहावीमध्ये असणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीच्या लढ्याला अखेर यश आले आहे.वेंगुर्ला हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेली श्रुती दीपक पाटील ही अंशत: अंध आणि सेरेब्रल पाल्सी या त्रासाने ग्रासली आहे. आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार  देण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती शिक्षण मंडळाने फेटाळून लावली होती.

दरम्यान, त्याविरोधात श्रुतीच्यावतीने अ‍ॅड. प्रोस्पर डिसोझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांची ही समस्या न्यायालयाने लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण मंडळाने केवळ विशेष बाब म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याची तयारी दर्शविली होती.

मंगळवार ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या या सहकार्याबद्दल दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देणे सोईचे बनले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गexamपरीक्षा