शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

रत्नागिरीत दहा हजार वीजजोडण्या

By admin | Updated: August 22, 2014 23:20 IST

महावितरण : वर्षभरात निवासी इमारतींच्या संख्येत मोठी भर

रत्नागिरी : अपार्टमेंट्सच्या वाढत्या संख्येमुळे महावितरणच्या वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १० हजार ११५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३,१९९ म्हणजेच ३१ टक्के जोडण्या फक्त रत्नागिरी विभागात देण्यात आल्या. रत्नागिरीत अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात ७,८६६ घरगुती वीज मीटरच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. ११५७ वाणिज्य मीटर, ८५ औद्योगिक मीटर देण्यात आले आहेत. पथदीप १९२, तर कृषीपंप ६५६ देण्यात आले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठाचे ५०, तर उच्च दाबाच्या औद्योगिक वीज जोडण्या ४ दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ११५ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागात घरगुती २५०७, वाणिज्य ४०६, पथदीप २८, औद्योगिक ४७, सार्वजनिक पाणीपुरवठा १८९, लघुदाबाच्या अन्य १६ जोडण्या मिळून ३,१९९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. चिपळूण विभागात घरगुती १३९२, वाणिज्य १७६, पथदीप २०, औद्योगिक ९, कृषिपंप ४६, पाणीपुरवठा ५ मिळून १६४४ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. खेड विभागात घरगुती १२०६, वाणिज्य १७८, औद्योगिक १५, कृषिपंप ८८, सार्वजनिक पाणीपुरवठा १३, अन्य १९ मिळून १५१३ नवीन जोडण्या वर्षभरात देण्यात आल्या. तिन्ही विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात सर्वाधिक जोडण्यात दिसून येत आहेत.मुंबई, पुणेच्याबरोबरीनेच कोकणात स्वत:चे घर असावे, अशा सेकंड होमची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. परिणामी नवीन जोडण्या वाढत असलेल्या दिसून येत आहेत. घरे बांधण्याच्या तुलनेत इमारती अधिक आहेत.त्यासाठी जोडणीची गरज आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात वीज जोडण्यांना मागणी दिसून येत आहे. रत्नागिरीत घरे घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम वाढत आहे. त्यामुळे घरगुती मीटरमध्ये वाढ होत आहे.एस. पी. नागटिळक, महावितरण रत्नागिरी.