शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात एसटीची अपघातांची मालिका, आसोली-वडखोलत टेम्पो व एसटीत धडक; आठवड्यात तिसरी घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 15, 2022 13:17 IST

भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोची एसटीला धडक बसून दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात एसटी महामंडळाला अपघातांचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न पडत आहे. देवगड तालुक्यातील शिरगाव अपघातानंतर वेंगुर्ला तालुक्यात मातोंड आणि आज गुरुवारी आसोली वडखोल येथे भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोची एसटीला धडक बसून दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास आसोली-वडखोल येथे घडला.दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत जाग्यावर गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. तर टेम्पोच्या मागील हौद्यात बसलेल्या एका चिमुकलीसह परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी वडखोलच्या दिशेने जात होती. यावेळी अवघड वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. टेम्पोच्या टायरची झीज झाल्यामुळे ब्रेक लावून सुद्धा चालकाला त्यावर ताबा मिळवता आला नाही. दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी जागेवरच थांबविल्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली. मात्र तरीसुद्धा दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात टेम्पोच्या समोरील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. तर एसटीच्याही समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त एसटीत कोणीही प्रवासी नव्हते. मात्र टेम्पोच्या हौद्यात बसलेल्या एका चिमुकलीसह परप्रांतीय कामगार बालंबाल बचावले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात