शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेला सुरुवात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2024 18:39 IST

पात्र ग्रामपंचायतींना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक देणार

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आता क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आता क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे, तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षय रोगाचे निकष पूर्ण केल्यास ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. या उपक्रमात १००० लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी करायची आहे. त्यामध्ये एक किंवा कमी (निरंक) रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पात्र ठरणार आहे. क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिकरीत्या कौतुक करणे, असे या उपक्रमाचे उद्देश असल्याचे डॉ. हर्षल जाधव यांनी सांगितले.

तसेच या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असून या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायत