शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मालवण बंदर विभागाला टार्गेट

By admin | Updated: January 7, 2015 23:55 IST

पर्यटन व्यावसायिक आक्रमक : करमणूक करासाठी मालवणात बैठक

मालवण : अधिकृत परवान्यानुसार बंदरात बोटींग व्यवसाय करीत असताना अनधिकृत बेकायदेशीर बोटींग करणाऱ्या व्यावसायिकांना बंदर विभाग तथा मेरिटाईम बोर्डाकडून अभय दिले जाते. गेल्या तीन वर्षात एकाही अनधिकृत बोटींग व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली नाही. यामुळे तारकर्ली, देवबाग व मालवण येथे बोटींग व्यावसायिकांमध्ये आपापसात वाद निर्माण झाले. याला बंदर विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असा थेट आरोप येथील पर्यटन व्यावसायिकांनी केला. यावर तहसीलदार वनिता पाटील यांनी बंदर विभागाबाबत बोटींग व्यावसायिकांच्या तक्रारी असल्याने वरिष्ठांना लेखी कळविणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या आदेशानुसार बुधवारी तहसील कार्यालयात करमणूक कराच्या आकारणीसंदर्भात पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंडल अधिकारी मंगेश तपकिरकर, रामचंद्र कुबल, मनोज खोबरेकर, संजय केळुस्कर, रूपेश प्रभू, दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, डॉ. पांडुरंग कासवकर, मंगेश सावंत, सदा तांडेल, मोहन केळुस्कर, गजा कुबल यांसह अन्य बोटींग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्टस, स्कुबा डायव्हींग व्यावसायिक उपस्थित होते. रामचंद्र कुबल म्हणाले, मेरिटाईम बोर्ड तथा बंदर विभागाकडून अद्याप अनधिकृत प्रवासी बोटींग वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली नाही. बंदर विभागाकडून याउलट परवाना धारकांवर कारवाई केली जाते. आम्ही अधिकृतपणे बोटींग व्यवसाय करीत असून त्यासाठी संस्थाही स्थापन केली आहे. शासनाला आमचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. बंदर विभागाच्या डोळेझाकपणामुळे मागील वर्षात सुमारे साडेतीन लाखांचा महसूल बुडाला आहे. बंदर अधिकारी शासनाची आणि जनतेची फसवणूक करतात. अनधिकृत बोटींग व्यवसायावर बंदर विभागाने कडक कारवाई सुरू केली पाहिजे, असेही कुबल म्हणाले.आम्ही परवानाधारक आहोत तरीही बंदर विभाग आम्हाला नाहक त्रास देत असल्याचे संजय केळुस्कर म्हणाले. बंदर विभागाच्या चुकीच्या कारवाईमुळे मला नाहक ६० हजार रूपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.यावेळी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत म्हणाले, किल्ला पाहण्यासाठी पर्यटन हंगामात बहुसंख्येने अभ्यासगट व शालेय सहली येत असतात. अशावेळी शालेय मुलांकडून पर्यटन कर कसा वसूल करणार? यावेळी बोटींग व्यावसायिक दामोदर तोडणकर म्हणाले, पर्यटन कराची आवश्यकता आहे. पण याबरोबरच बोटींग व्यवसायात सुरू असलेली दलाली थांबली पाहिजे. पर्यटन व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी बोटींग, वॉटर स्पोर्टस, स्कुबा डायव्हींग यांच्यासाठी एक खिडकी सुरू करण्यासाठी शासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)४ मालवण तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीस अतिमहत्त्वाची जबाबदारी बजावणाऱ्या मालवण बंदर विभागाचे बंदर निरीक्षक आर. जे. पाटील हे अनुपस्थित होते. बंदर विभागामार्फत प्रतिनिधी सहाय्यक बंदर निरीक्षक एस. वाय. सिकलिकर हे उपस्थित होते. याबाबत तहसीलदार वनिता पाटील यांनी पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत सिकलिकर यांना जाब विचारला. यावेळी सिकलिकर यांनी पाटील हे विजयदुर्गला गेल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी बंदर निरीक्षकांना बैठकीबाबत लेखी व तोंडी सूचना करण्यात आल्या होत्या. तरीदेखील बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त केली.मनोरंजन कर आवश्यकमुंबई पोलीस अधिनियमानुसारच मनोरंजन कर वसूल केला जाणार आहे. यासाठी २००३ मध्ये नियमावली तयार करण्यात आली आहे. यासाठीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केले जातील. ही एक चांगली प्रक्रिया असून वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांनी शासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. मनोरंजन कर हा आवश्यक आहे.- वैशाली पाटील,तहसीलदार, मालवण