शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

वेळ पडल्यास तलवारी हातात घ्या

By admin | Updated: January 24, 2016 00:40 IST

चंद्रकांतदादा पाटील : कुडाळमधील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आवाहन

कुडाळ : आमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा असून, कोणाच्या वाटेला आम्ही जात नाही आणि आमच्या वाटेला आला तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असे मी नारायण राणे यांना सांगू इच्छितो. पक्षवाढीच्या कार्यक्रमात कोणीही आले तरी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुडाळ येथील ‘अतुलनीय सिंधुदुर्ग अतुलनीय कार्यकर्ता’ कार्यक्रमात केले. वेळ पडल्यास तलवारी हातात घ्या, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत लवकरच अतुल काळसेकर यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांच्या ‘अतुलनीय सिंधुदुर्ग अतुलनीय कार्यकर्ता’ या कार्यवृत्तांत अहवालाचे प्रकाशन व कार्यकर्ता मेळावा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, (पान १ वरून) आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, अजित गोगटे, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, बाबा देसाई, अतुल काळसेकर, डॉ. अभय सावंत, काका कुडाळकर, राजू राऊळ, राजश्री धुमाळे, चारूदत्त देसाई, बंड्या सावंत, प्रभाकर सावंत, पुखराज पुरोहित, अर्चना काळसेकर, संतोष शिरसाट, शामकांत काणेकर, नीलेश तेंडुलकर, बाळू देसाई, बब्रुवान भगत, बाबा मोंडकर, सर्फराज नाईक व भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, कोकणच्या विकासासाठी भाजप सरकार नेहमी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रत्येक तालुक्यात एकतरी पणन उद्योग प्रकल्प उभारण्यात यावा. आम्ही सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महिलांनी नवीन उद्योग उभारावेत. जलयुक्त शिवार या योजनेमुळे राज्यातील अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आता ही योजना राज्यातील ३३ हजार गावांमध्ये राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पुढची विधानसभा लढविणार : काळसेकरआज माझ्या कार्यवृत्तांत अहवाल प्रकाशनाला असणाऱ्या उपस्थितीने मी भारावून गेलो आहे. ज्या पक्षात कोणतीही स्पर्धा नाही, त्या पक्षाचे मी काम केले, याचा मला अभिमान आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. आमचा पक्ष घराणेशाहीचा पक्ष नाही. तो सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असे अतुल काळसेकर यांनी सांगून, पुढची विधानसभा मी लढविणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी जाहीर केले.राणेंच्या दादागिरीला घाबरू नकाजिल्ह्यात राणेंच्या दादागिरीला घाबरू नका. पक्षवाढीसाठी आता जोमाने काम करा. कोणी अडसर करीत असल्यास खपवून घेऊ नका. जिथे सुईने काम होत असेल, ते काम सुईनेच करा. जिथे तलवार वापरावी लागेल, तिथे तलवार वापरा, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. राणेंना जिल्हा सोडायला लावला : जठार या जिल्ह्यात पंचवीस वर्षे सत्ता गाजवून कोणताही विकास न करता येथे केवळ समस्या निर्माण करणाऱ्या नारायण राणे यांना येथील लोकांनीच जिल्हा सोडायला लावला. त्यांचे दोन पुत्र ‘दो बिचारे बिना सहारे’ बनले असून, ते उगाचच दीपक केसरकर यांच्यावर टीका करीत आहेत, असा टोला जठार यांनी राणेंना लगावला. यावेळी अतुलनीय सिंधुदुर्ग व अतुलनीय कार्यकर्ता या अतुल काळसेकर यांच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. वेंगुर्ले नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रसन्ना कु बल यांच्या पत्नी स्रेहा कु बल यांनी अनेक महिलांसोबत राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेचे पिंगुळीचे पदाधिकारी संजय परब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.