शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

वृक्षतोडीबाबत सर्वेक्षण करा

By admin | Updated: January 13, 2016 21:44 IST

बबन साळगावकर यांचे आदेश : सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक

सावंतवाडी : शहरात कोणत्याही ठेकेदाराने नगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासी संकुलासाठी वृक्षतोड केली असेल तर त्याचे सर्वेक्षण करा आणि ज्यांनी परवानगी घेतली नसेल अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांना दिले. नगरपालिकेच्या मासिक बैठकीत उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, नगरसेवक संजय पेडणेकर, गोविंद वाडकर, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, उमाकांत वारंग, राजू बेग, नगरसेविका अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, अफरोझ राजगुरू, कीर्ती बोंद्रे, साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत आदी बैठकीला उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी नगरपालिका सबनीसवाडा येथे जलनि:सारण प्रकल्प राबवत आहे. याला नगरसेवक गोविंद वाडकर यांनी आक्षेप घेत शहरात उभाबाजार, तसेच सालईवाडा येथे मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होते. हा भाग उंचावर आहे. मात्र, सखल असलेल्या सबनीसवाडा भागात जलनि:सारण प्रकल्प कशासाठी, असा सवाल उपस्थित केला. यावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जलनि:सरण प्रकल्प हा सबनीसवाडा हा प्रभाग माझ्या मतदारसंघात येतो म्हणून करण्यात आला नाही. तर संपूर्ण शहराचे सांडपाणी हे सबनीसवाडा भागातच येते. त्यामुळे निरा कंपनीच्या सहाय्याने पायलट प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात अन्य ठिकाणीही असे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागासवर्गीय मुलांना शाळेचे गणवेश उशिरा देण्यात आले आहेत. हा मुद्दा नगरसेवक वाडकर यांनी उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी ज्याठिकाणी शाळेच्या मुलांना गणवेश उशिरा मिळाले असतील, त्यांची यादी तयार करा व ठेकेदार दंडात्मक कारवाई करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. तर शहरात पूर्वपरवानगी शिवाय निवासी संकुलाच्या जाग्यावरील वृक्षतोडप्रकरणी लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून, त्यांच्या बांधकामाची परवानगीही रद्द करण्यात येणार आहे. त्यांची कडक अमलबजावणी करा, असे नगराध्यक्षांनी प्रशासनाला सांगितले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे सभागृहात अनुपस्थित असल्याने त्यांच्या पत्राचे वाचन अ‍ॅड. सुभाष पणदूरकर यांनी केले. (प्रतिनिधी) बाप्पा नार्वेकरांचा आदरपूर्वक उल्लेख करा : उमाकांत वारंग यांना सभ्यतेचा डोस सावंतवाडीत मध्यवर्ती असलेल्या संकुलाच्या कै. बाप्पा नार्वेकर संकुलाच्या ठिकाणी अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे. याचा ठराव वाचत असताना नगरसेविका क्षिप्रा सावंत यांनी ठरावातील उल्लेखाप्रमाणे बाप्पा एवढेच नाव घेतले, याला नगरसेवक राजू बेग यांनी आक्षेप घेत कै. बाप्पा नार्वेकर आदरणीय व्यक्ती होती. त्यांचे नाव आदरपूर्वक घ्या, असे सांगितले. यावरून नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करीत चूक झाल्याचे मान्य केले. पालिका बैठकीत मुलांना गणवेश उशिरा दिल्यावरून चर्चा सुरू असतानाच नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पँट अगोदर दिली का, असा प्रश्न सभागृहात केला. त्यावर नगराध्यक्ष बबन साळगावकर चांगलेच सतापले आणि त्यांनी वारंग यांना हे सभागृह आहे. येथे सभ्यतेनेच बोला, विषयांची चेष्टा करू नका, असे बजावले. ‘आरटीओ’ कॅम्पला जागा द्या सावंतवाडी विश्रामगृहाच्या बाहेर आरटीओ कॅम्प घेण्यात येत होता. मात्र, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत असल्याचे लक्षात येताच पालिकेने मंगळवारच्या बैठकीत ठराव घेऊन हा कॅम्प जिमखाना नजीकच्या मैदानावर घेण्याचे ठरवले असून, त्याला सभागृहाने एकमताने मान्यता दिली. विनामोबदला हा कॅम्प भरवण्यास देण्यात येणार आहे.