शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘सिंधुसरस’ मालवणात घ्या

By admin | Updated: February 20, 2015 23:12 IST

देवानंद चिंदरकर : मालवण पंचायत समिती सभेत ठराव

मालवण : कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुसरस या स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वस्तू प्रदर्शन विक्री स्टॉलना जिल्ह्यातून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सिंधुसरस या कार्यक्रमाचे स्थळ चुकीचे होते. त्यामुळे हा कार्यक्रम पुढील वर्षी पर्यटन हंगामात मालवण येथे घेण्यात यावा अशी सूचना पंचायत समिती उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी शुक्रवारी बैठकीत केली. या संबंधीचा ठरावही सभेत घेण्यात आला.पंचायत समिती मालवणची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाच्या स्थळाला आक्षेप घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने सिंधुसरस या स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तू प्रदर्शन विक्रीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले. वस्तुत: कार्यक्रमाचे स्थळ स्टॉलच्या विक्रीसाठी चुकीचे होते. हा कार्यक्रम ४ ते ५ दिवस सुरु होता. मात्र वस्तूंच्या खरेदी विक्रीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सिंधुसरसमध्ये बांबू, हस्तकला, लाकडी खेळणी, खाद्यपदार्थ, काजू कोकम यासारख्या वस्तूंचे स्टॉल होते. मुळात स्थानिक स्तरावर या वस्तूंची विक्री होणे अशक्य होते. महिलांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. यामुळे सिंधु सरस यासारखे कार्यक्रम पर्यटन हंगामात नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत मालवणमध्ये घेण्यात यावे. याचा फायदा पर्यटकांसह जिल्ह्यातील महिलांना होऊन प्रदर्शनाचा किंबहुना शासनाचा प्रत्येक कुटुंब आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न सफल होईल अशा सूचना चिंदरकर यांनी केल्या. या संबंधीचा ठरावही सभेत घेण्यात आला.यावेळी पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळुसकर यांनी आंबेरी आरोग्य उपकेंद्रात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. आंबेरी गावात नळपाणी योजना व्हावी यासाठी आपण पाठपुरावा पंचायत समिती येथे करत असताना याकडे पंचायतीचे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले.यासंबंधी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी नळपाणी योजनेसाठी प्रयत्न करण्यात येतील. तशा सूचना संबंधित विभागाला देण्याचे आश्वासन दिले.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानिमित्त सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेप्रसंगी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोजरकर, उदय परब, सुजला तांबे, भाग्यता वायंगणकर, चित्रा दळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सी वर्ल्ड बैठका मालवणात घेण्याचा ठरावसी वर्ल्ड प्रकल्प तोंडवली, वायंगणी येथे जाहीर झाल्यानंतर प्रकल्पाच्या स्वागताचा ठराव मालवण पंचायत समितीने केला होता. प्रकल्प मालवण तालुक्यात होत असताना बैठका ओरोस, कुडाळ येथे का होतात? सी वर्ल्ड प्रकल्प सादरीकरण किंवा नियोजनाच्या सर्व बैठका मालवणमध्ये यापुढे घेण्यात याव्यात, अशी सूचना उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी केली. याबाबतचा ठराव सभेत घेण्यात आला.