शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

डेंग्यू तापाबाबत योग्य खबरदारी घ्या

By admin | Updated: November 16, 2014 23:46 IST

शासकीय रुग्णालयांचा आढावा : डॉक्टरांचे तांत्रिक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्र, शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेस सहाय्यक संचालक, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. एम. एम. खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण, खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. बी. जी. शेळके, डॉ. गीता मोघे, डॉ. संजीव आकेरकर उपस्थित होते.डॉ. संजीव आकेरकर यांनी डेंग्यू लागण होण्याची कारणे, त्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी व औषधोपचार याबाबत वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्यकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी आदींना तांत्रिक मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, बालरोगतज्ज्ञ डॉ. ढवळे, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी हिवताप, डेंग्यू संदर्भात सद्यस्थितीची व सुरु असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण यांनी ब्रुसेलोसिस व लेप्टोस्पायरोसीस या आजाराच्या उपाययोजनांबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देऊन याबाबत जनतेने घ्यावयाची खबरदारीची जाणीव करून दिली. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील जवळपास ८ हजार पाळीव जनावरांना ब्रुसेलोसीस प्रतिबंध लसीकरण केल्याचे सांगून ही कार्यवाही अद्यापही सुरु असल्याचे विषद केले. कोल्हापूरचे सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. एम. एम. खलिपे यांनी हिवताप, डेंग्यू व इतर तापाच्या रोगाबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करून जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाययोजनांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आजअखेर हिवताप १२३, डेंग्यू ४६, लेप्टोस्पायरोसीस २ असे रुग्ण आढळलेले असून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना सुरु असून जनतेचेही सहकार्य मिळावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये यांनी केले. तसेच डेंग्यू, हिवताप, लेप्टोस्पायरोसीस व इतर तापाच्या रुग्णाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सुरु असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्यकेंद्र यांची आढावा सभा आयोजित केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात आढावा बैठक घेणार २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत कुडाळ व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत वेंगुर्ला, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत देवगड व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत वैभववाडी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत दोडामार्ग व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सावंतवाडी, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत कणकवली व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत मालवण येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी हे आढावा घेणार आहेत.