शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पर्यटकांच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करा, अजिंक्य पाताडे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:08 IST

पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे केली.

ठळक मुद्देपर्यटकांच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करा, अजिंक्य पाताडे यांची मागणी वाढत्या दुर्घटनांनी पर्यटनाची हानी

मालवण : पर्यटनामुळे मालवणचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, अलीकडच्या काळात पर्यटन करताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाची मोठी हानी होत असून राज्यातून येणाºया पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे केली.मालवण, दांडी, देवबाग किनारी गेल्या महिनाभरात पाच दुर्घटना घडल्या. त्यात दोघा पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर बंदर विभाग व संबंधित प्रशासनाला जागे करण्यासाठी सभापती, उपसभापती यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली.पर्यटकांच्या वाढत्या अपघातांमुळे पर्यटनावर संक्रात येऊ शकते. त्यामुळे पर्यटकांना दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. पर्यटकांना मार्गदर्शक आणि धोक्याच्या सूचना देण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असलेल्या किनाऱ्यावर जीवरक्षकांची नेमणूक केली जावी.

पर्यटन क्षेत्रात होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असून पर्यटकांनाचा जीव गेल्यावर अ‍ॅक्शन घेण्यापेक्षा त्यांचे लाखमोलाचे जीव वाचविणे आपले कर्तव्य आहे, असे पाताडे व वराडकर यांनी सांगितले.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्यावतीने मुंबईत दोन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आल्याचे बंदर निरीक्षक ताम्हणकर यांनी सांगितले. वाढत्या दुर्घटनांमुळे मालवणच्या पर्यटनाबाबत चुकीचा संदेश राज्यभर पोहोचत असल्याने त्या बैठकीत आम्ही मांडलेल्या सूचना मांडण्यात याव्यात.

येथील पर्यटन बहरावे, अपघात होऊ नयेत, पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी आमची भूमिका असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग