शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राउत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; सावंतवाडीत भाजपकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 19:15 IST

घटनास्थळी पोलिस मात्र दिसले नाहीत. या आंदोनलनानंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी तसेच बंदोबस्त ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राउत यांना कुठेही मिळाल्यावर फटकवू असे म्हणताच त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यूतर दिले.त्यानंतर शिवसेना भाजप मधील वाद चांगलाच वाढत गेला असून,शुक्रवारी शिवसेनेने निलेश राणे यांचा पुतळा जाळला तर त्याला प्रत्युतर म्हणून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राउत यांचा पुतळा जाळून चप्पल मार आंदोलन करण्यात आले.सालईवाडा परिसरात हे आंदोलन करण्यत आले.

यामध्ये नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर,दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान नगरसेविका दिपाली भालेकर,परिणीती वर्तक, बटी पुरोहित,सभापती मिनल धुरी,परिशीत माजरेकर आदि सहभागगी झाले होते.गेले चार दिवस शिवसेना भाजप मध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे.त्यांचा दुसरा अंक शुक्रवारी जिल्हयात पाहिला मिळाला ओरोस येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केल्याचे ताजे असतनाच सावंतवाडीत खासदार विनायक राउत यांंच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वता हातात चप्पल घेउन राउत यांंच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले.भाजप ने अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारबंळ उडाली होती.

घटनास्थळी पोलिस मात्र दिसले नाहीत. या आंदोनलनानंतर पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी तसेच बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :BJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत