शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिने मिळविली पशुवैद्यकीय पदवी, या क्षेत्रात मुलींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 17, 2023 16:34 IST

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नाली सुतार हिने आपल्या जिद्ध आणि प्रयत्नांच्या जोरावर पशुवैद्यकीय पदवी ...

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नाली सुतार हिने आपल्या जिद्ध आणि प्रयत्नांच्या जोरावर पशुवैद्यकीय पदवी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये पास होत मिळवली आहे. मुक्या प्राण्यांचे जीवन सुकर होण्यासाठी तण-मन-धन अर्पण करून सेवा देण्याचा तिचा मानस आहे.स्वप्नालीचे प्राथमिक शिक्षण दारिस्ते सारख्या खेडेगावात तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल व उच्च माध्यमिक कणकवली कॉलेज येथे झाले आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तिने दहावीला ९७ टक्के तर बारावीला ८६ टक्के मिळवत बोर्डाच्या आलेखावर आपले नाव कोरले. लहानपणापासूनच प्राण्यांची आवड असलेल्या स्वप्नालीला त्यांच्या मुक्यापणामुळे होणारी होरपळ, त्यांच्या वेदना, त्यांना होणारे आजार अस्वस्थ करत होते. मुक्या प्राण्यांचे आजार व त्यांना होणाऱ्या वेदना पाहूनच मला या क्षेत्रात येण्याची आसक्ती लागल्याचे स्वप्नाली सांगते.या क्षेत्रात मुलींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. तरी पण स्वप्नालीने हे क्षेत्र मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने निवडले. तिचे आई-वडील शेतकरी असून मुलीने निवडलेल्या या जोखमीच्या क्षेत्राबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. कोरोना काळात तर तिला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते; परंतु तिने त्यावर मात करत आपले लक्ष पूर्ण केले.

सेमिनारच्या निमित्ताने अनेक भागात जाण्याची संधीमुंबई पशुवैद्यकीय कॉलेज गोरेगाव येथे तिने आपले पशुवैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये ८३.६२ टक्के गुण मिळवत तिने आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. साडेपाच वर्षांचा हा डिग्री कोर्स पूर्ण करताना तिला गोवा, तामिळनाडू, उत्तराखंड, गुजरात, अहमदाबाद, सिलवासा याठिकाणी सेमिनारच्या निमित्ताने जायची संधीही मिळाली. दारिस्ते सारख्या खेडेगावातून पुढे जाऊन स्वप्नालीने मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास पात्र आहे. तिच्या या यशाबद्दल कनेडी दशक्रोशीतून तिचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग