शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:56 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर : बबन साळगावकर यांची माहिती स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

सावंतवाडी : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, शहरात जमा होणाऱ्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे सहा प्रकल्प शहरात उभे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून २४ तासात खत निर्मिती होणार आहे. शहरातील भाजी मार्केट, मच्छिमार्केट, नरसोबा मंदिर, गोठण, जुस्तीननगर, सर्वोदयनगर, बाहेरचावाडा आदी ठिकाणी हा प्रकल्प होणार असून, प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेच्या जिमखाना येथील मनुष्यबळ विकास केंद्र्रात स्ट्रीम कास्ट ही कंपनी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तर सावंतवाडी शहर सुका व ओला कचरा वर्गीकरण करणारे शहर असून, जवळपास ९८ टक्के सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्यात येतो.

नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम असे घनकचरा व्यवस्थापन करणारी सावंतवाडी नगरपालिका असून, भविष्यात कचºयावर प्रक्रिया करणारी नगरपालिका म्हणून सावंतवाडी पालिकेचे नाव घेतले जाईल, अशी आशाही साळगावकर यांनी बोलून दाखवली.कचर्‍यावर प्रक्रिया करून तयार होणारे खत दहा रुपये व वीस रुपये किलोने विक्री करून त्यातून आर्थिक उन्नतीही पालिका साधणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी सांगितले.एजी डॉटर्सबाबत अद्याप विचार नाही!कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या एजी डॉटर्स या कंपनी संदर्भात पालिकेने अद्याप कोणताच विचार केलेला नाही. पालिकेने कचर्‍यावर प्रकल्प करणारी स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने भविष्यात कणकवली नगरपालिकेने स्वीकारलेल्या या कंपनीच्या कामकाजानुसार पाहणी करून योग्य विचार केला जाईल, असे साळगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग