शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आंबोलीत सापडलेली संशयास्पद दुचाकी पानसरे हल्ल्यातील ?

By admin | Updated: March 22, 2015 00:26 IST

तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत

सावंतवाडी़/कोल्हापूर : आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास सध्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस करीत आहेत. या मोटारसायकलीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंबोली येथे येऊन घटनास्थळांची व दुचाकीची पाहणी करून परतले. याबाबतचा अहवाल ते पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार आहेत. त्यानंतरच या तपासाची सूत्रे हलणार आहेत. या मोटारसायकलीचा नंबर के ए २८ व्ही- ५०३१ असा आहे. ही मोटारसायकल कर्नाटकातील राजशेखर नामक व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती आॅगस्ट २०१४ मध्ये चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बेळगावातील पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरची हद्द संपल्यानंतर अवघ्या चार किलोमीटरवर ९ असलेल्या गडदूवाडी आंबोली येथे मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर मोटारसायकल बेवारस स्थितीत वनमजुरांना आढळून आली. या वनमजुराने आंबोली पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून ती ताब्यात घेतली. यावेळी या मोटारसायकलीस पुढे व मागे नंबरप्लेट नव्हती. पुढचा भागही फुटलेल्या अवस्थेत होता. मोटारसायकलीतील पेट्रोलही संपले होते. आंबोली पोलिसांनी या गाडीचा पंचनामा केला तसेच याची खबर सर्वत्र दिली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर पोलिसांचे पथक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोलीत दाखल झाले. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांनीही काळ््या रंगाची दुचाकी वापरली होती. आंबोलीत सापडलेली दुचाकी व मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी यात साम्य वाटत असल्याने पोलिसांनी दुचाकीसह जागेची पाहणी केली. ही गाडी नेमकी कुठली याचा शोधही त्यांनी घेतला. कर्नाटकमधील राजशेखर शेखदारस यांच्या मालकीची ती असल्याचे निष्पण्ण झाले. ही मोटारसायकल २७ आॅगस्ट २०१४ ला चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी बेळगाव या पोलीस ठाण्यात दिली असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. या दुचाकीच्या तपासाबाबतचा अहवाल कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देणार असून, त्यानंतर पुढील तपासाची सूत्रे हलविण्यात येणार आहेत. पुढील भाग तुटलेल्या अवस्थेत गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी जी दुचाकी वापरली होती, ती काळ्या रंगाची होती तसेच या दुचाकीला कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलची धडक लागली होती. यावेळी सायकलस्वार व मारेकऱ्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे सायकलच्या धडकेनंतर दुचाकीचा पुढील भाग मोडू शकतो का, याचाही अभ्यास सुरू असून, सद्य:स्थितीत काहीअंशी या मोटारसायकलीचे पुरावे मिळते जुळते आहेत. (प्रतिनिधी)