शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडमधील संशयितास जामीन, दोन वर्षानंतर येणार बाहेर

By अनंत खं.जाधव | Updated: November 6, 2023 16:39 IST

सावंतवाडी : सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला अखेर जिल्हा न्यायालयाने ...

सावंतवाडी : सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला अखेर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे हत्याकांड कर्ज बाजारीपणातून घडल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या प्रकरणी 14 नोव्हेंबरला संशयिताला अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षानंतर संशयित जामीनावर बाहेर येणार आहे.सावंतवाडी शहरात 30 ऑक्टोबर 2021 मध्ये उभाबाजार येथे दुहेरी हत्याकांड घडले होते. यात नीलिमा नारायण खानविलकर व शालिनी सावंत या दोघा महिलांचा खून करण्यात आला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तब्बल पंधरा दिवसानंतर म्हणजेच  14 नोव्हेंबर 2021 ला खानविलकर यांच्या शेजारी राहात असलेल्या कुशल टंगसाळी याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 8 ग्रॅम सोन्यासाठी हे हत्याकांड केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आले होती. या पार्श्वभूमीवर संशयित तब्बल दोन वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड.स्वप्निल कोलगावकर व अॅड.संकेत नेवगी यांनी काम पाहिले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय