शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाणी नसल्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियाच स्थगित

By admin | Updated: May 21, 2015 00:01 IST

४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

राजापूर : शहरातील महत्त्वपूर्ण अशा ग्रामीण रुग्णालयाला पंचायत समितीने पाणी पुरवठा करायचा की, नगर परिषद प्रशासनाने, हा वाद सुरू झाल्याने समस्त आरोग्य यंत्रणेसह रुग्णांना विविध प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या वादामुळे रुग्णालयातील ४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.एक महिन्यापूर्वीच राजापूर ग्रामीण रुग्णालयाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडे पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी स्वरुपात मागणी केली होती. एवढ्या कालखंडात या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात पंचायत समितीने दिरंगाई दाखवली, तर दुसरीकडे राजापूर नगर परिषद प्रशासनादेखील त्या रुणालयाला पाणी पुरवठा केलेला नाही. या दोन प्रशासनाच्या वादात कडाक्याच्या उन्हाळ्यात रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेसह विविध आजारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाण्याअभावी त्रेधातिरपीट उडाली आहे. मागील काही दिवस रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मागणीनुसार खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी दरदिवशी रुग्णालयाला लागणारे पाणी लक्षात घेता तेवढा पुरवठा होत नसल्याने अंतर्गत उपचार पद्धतीला अडथळा ठरत आहे.या रुग्णालयात हार्निया, हायट्रोसिस, फायमोसिस अशा आजारांनी त्रस्त असलेल्या ४५ शालेय विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार होत्या. शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत एकूण ७५ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया होणार होत्या. यापूर्वी ३० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. उर्वरित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयाने तयारी सुरू केली होती मात्र पाणीटंचाई आड आली.शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता जेव्हा मुबलक पाणी उपलब्ध होईल त्यानंतरच शस्त्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.पंचायत समिती व नगर परिषद प्रशासन यापैकी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करायला कोणीच तयार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. एवढे असूनही आमच्या लोकप्रतिनिधींना त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याची स्थिती खेदजनक आहे. निदान आता तरी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.राजापूर ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एखादी पाणी योजना राबवण्याबाबतचा निर्णय सुमारे १० वर्षांपूर्वी झाला होता. भटाळीलगत नदीपात्रात विहीर खोदून त्याद्वारे रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नंतर पुढे काहीच हालचाल न झाल्याने मागील दशकाच्या कालखंडात या रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसून, पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागतेय. (प्रतिनिधी)ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा कोणी करायचा, या वादात पाणी-पुरवठाच होत नाही.आतापर्यंत पंचायत समितीने पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई दाखवल्याने टंचाई कायम आहे.आपली जबाबदारी नसल्याचे सांगून नगर परिषदेने हात झटकले आहेत. यामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत.