शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:49 IST

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्दे महिलांनी काढली प्रभातफेरी अभियान वाचविण्यासाठी शासनाला मदत

कणकवली : राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे, नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रामसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषीसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली व स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता सावंत, सचिव प्राजक्ता सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सावंत, सीआरपी ताई सारीका सावंत यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ अध्यक्ष रविना सुतार, सचिव शांती फर्नांडिस, सीआरपी ताई योगिता चव्हाण, सीआरपी ताई तन्वी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली.

यामध्ये सीआरपी ताई पूजा सावंत, कृषी सखी गीतांजली कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी ताई जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता सुतार, सचिव श्वेता शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या, उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र या अधिकाºयांना काढून हे अभियान बंद करू नये.नोकरीवर कायम ठेवा व अभियान वाचवा संदेशयावेळी सर्व ग्रामसंघाच्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया गोळा केला. ही रक्कम शासनाला पाठविली जाणार असून, तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र , हे अधिकारी आणि कर्मचारी कमी करू नका, आम्हाला आत्मनिर्भर करणाऱ्या या लोकांना नोकरीवर कायम ठेवा आणि अभियान वाचवा, असा संदेश दिला जाणार आहे. 

 

टॅग्स :GovernmentसरकारWomenमहिलाsindhudurgसिंधुदुर्ग