शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीराला सिंधुदुर्गात प्रतिसाद

By admin | Updated: May 6, 2017 17:34 IST

ट्रॅकसूट, शूज व खेळाच्या पोशाखाचे वाटप

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन २0 ते ३0 एप्रिल २0१७ पर्यंत सकाळी व सायंकाळी या दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षण शिबीराचे उद्धाटन अमरसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन शशिकांत अणावकर यांच्या हस्ते झाले. या कार्यालयास सचिव आप्पा गावडे, डॉ. गाडेकर, सावंत व प्रशालेचे शिक्षक वृंद उपस्थित होते. या शिबीरात जिल्ह्यातील डॉन बास्को हायस्कूल ओरोस, प्राथमिक शाळा कसाल व शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर या संस्थेतील ६0 खेळाडूंनी सहभाग घेतला होतो. या शिबीरात राष्ट्रीय मार्गदर्शक उदय पवार यांचे तत्रशुध्द मार्गदर्शन लाभले खेळाडूंना शारिरीक तदुरुस्ती, आहार व हॉकी क्रीडा प्रकारातील कौशल्ये व सराव खेळाडूंकडून करुन घेण्यात आला. रोज खेळाडूंना क्रीडा कार्यालयामार्फत दूध, अंडी, केळी यांचा सकस आहार देण्यात आला.

प्रशिक्षण शिबीराचा समारोप जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर व हॉकी महाराष्ट्र संघटनेचे सचिव किरण रेडकर यांच्या हस्ते झाला. उपस्थित सर्व खेळाडूंना प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कार्यालयामार्फत ट्रॅकसूट, शूज व खेळाच्या पोशाखाचे वाटप करण्यात आले. भुमी नाईक, समिधा पारकर व अथर्व अणावकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांनी खेळाचे महत्व ओळखून या खेळात कौशल्य संपादन करुन आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे तसेच राष्ट्रीय स्तरावर नाव चमकावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संजय मालवणकर, उदय पवार, धुरी सर, बोवलेकर मॅडम, रितेश साळगांवकर, सिध्दांत रायकर उपस्थित होते.