शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यमच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक, बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:22 IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसुब्रमण्यमच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक, बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेतर्फे सत्कारमातृत्व आधार प्रतिष्ठानने घरी जाऊन गौरविले

आचरा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.सुब्रमण्यम केळकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाखाधिकारी श्रीकृष्ण माधव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपशाखाधिकारी जयलाल जे., कर्मचारीवर्ग, ग्रामस्थ बाबाजी भिसळे, प्रल्हाद चिंदरकर, खेडेकर कौस्तुभ केळकर आदी उपस्थित होते.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविलेल्या सुब्रमण्यमचा नव्याने स्थापन झालेल्या मातृत्व आधार प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने त्याच्या चिंदर येथील राहत्या घरी जाऊन सत्कार करून आपल्या सेवाभावी संस्थेची सुरुवात केली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद उर्फ आप्पा चव्हाण, उपाध्यक्ष कृष्णा साळसकर, खजिनदार संतोष लुडबे, संचालक संतोष चव्हाण, विश्वास भोजने, विश्वास गावकर, मनोज खोबरेकर, राजन कुमठेकर, तपस्वी मयेकर आदी संचालक उपस्थित होते.सुब्रमण्यम केळकर हा शिक्षण घेताघेता भिक्षुकी करीत होता. त्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाजी मारली आहे. आचरा, चिंदर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन त्याने यूपीएससीसारख्या अतिशय कठीण परीक्षेमध्ये मोठे यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता तो एक आदर्श ठरणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग