शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थी,पालकांचा ठिय्या

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

शाळा सोडल्याचे दाखले अडविले : पाट हायस्कूलमधील प्रकार

सिंधुदुर्गनगरी : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले अडवून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडून केले जात आहे. या मनमानी कारभाराविरोधात न्याय मागण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील पाट हायस्कूलच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले फी भरण्याच्या कारणावरून रोखून ठेवण्यात आले आहेत. या विरोधात बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर संबंधित विद्यार्थी व पालक यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामध्ये महेश वेळकर, मकरंद मराळ हे पालक, स्वप्नील गवाणकर, ओमकार म्हापणकर, लक्ष्मण वेळकर, अनिकेत गोवेकर, शुभम हळदणकर, कृष्णा गावडे हे विद्यार्थी यासह २० ते २५ उपोषणकर्त्यांचा समावेश आहे.मुख्याध्यापक व काही मोजके सभासद यांची सभा घेऊन निश्चित करण्यात आलेली १० हजार ५०० रुपये एवढी फी भरणे गरीब पालकांना परवडणारी नाही. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी फीच्या कारणावरून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले अडवून ठेवले आहेत. या विरोधात संबंधित विद्यार्थी व पालकांनी बुधवारपासून जिल्हा परिषद भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जादा फी न भरल्याने दाखले रोखले. त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवनासमोर बुधवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)पालकांचे म्हणणेमाध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळावा म्हणून पाट हायस्कूलकडे रितसर अर्ज केला होता. मात्र, दाखले आणण्यासाठी गेलो असता पूर्ण फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असे संस्थेकडून सांगण्यात आले. शासकीय नियमानुसार होणारी फी भरण्यास आम्ही तयारी दर्शविली असता पालक सभेमध्ये ठरविल्याप्रमाणे १० हजार ५०० रुपये फी भरत नाही तोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही अशी भूमिका पाट हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची असून यासाठी दाखले रोखून ठेवले आहेत असे या पालकांचे म्हणणे आहे.