शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:26 IST

कणकवली शहरात मुख्य चौक ते बेलवलकर ज्वेलर्सपर्यंत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणे, महामार्गावर व बाजारपेठेमध्ये हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना पूर्णपणे बंदी, महामार्गावर भाजी विक्रेत्यांना दोन बॅरिकेट्सच्या आतमध्ये बसविणे, नगरपंचायतीच्यावतीने नो पार्किंग झोन तयार करणे तसेच डी. पी. रोडवर चारचाकी वाहनांसाठी एका दिशेने पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी, २६ ऑगस्टपासून सुरुवात समीर नलावडे यांची माहिती, कणकवली नगरपंचायतीमध्ये गणेशोत्सव नियोजन बैठक

कणकवली : कणकवली शहरात मुख्य चौक ते बेलवलकर ज्वेलर्सपर्यंत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणे, महामार्गावर व बाजारपेठेमध्ये हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना पूर्णपणे बंदी, महामार्गावर भाजी विक्रेत्यांना दोन बॅरिकेट्सच्या आतमध्ये बसविणे, नगरपंचायतीच्यावतीने नो पार्किंग झोन तयार करणे तसेच डी. पी. रोडवर चारचाकी वाहनांसाठी एका दिशेने पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

हॉटेल हॉर्नबिल व युको बँक या दोन ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येईल. असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून या नियोजनानुसार कणकवली शहरात २६ ऑगस्ट पासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली येथे नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीच्यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, वाहतूक शाखेचे निरीक्षक अरुण जाधव, विश्वजीत परब, नगरसेविका मेघा गांगण, बांधकाम समिती सभापती संजय कामतेकर, आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, महिला बालकल्याण समिती सभापती उर्मी जाधव, अभिजीत मुसळे, किशोर राणे व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल कामत, नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अबिद नाईक, रिक्षा संघटना प्रतिनिधी बाळा वरवडेकर, प्रभाकर कोरगावकर, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेण्यात आलेल्या निर्णयांची पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, कणकवली शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी चित्रमंदिर ते गांगोमंदिर हा नवीन डीपी रस्ता आचरा मार्गावरून येणाºया अवजड वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.रस्त्यांवर वाहनांचे अवास्तव पार्किंग करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील. तर हातगाडी व भाजी विक्रेते ठरवून दिलेल्या ठिकाणी न बसल्यास नगरपंचायत कारवाई करेल़. मुख्य चौकात दोन्ही रिक्षा स्टँड असलेल्या ठिकाणीच राहतील. मात्र, त्यांनी रांगेची शिस्त पाळावी. सहा आसनी रिक्षा पार्किंग व्यवस्था बसस्टँडसमोरील महामार्ग बॅरिकेट्सच्यामध्ये करण्यात येईल. रस्त्याच्या दुतर्फा दोरी ताणण्याबरोबरच पांढरे पट्टे मारण्यात येतील. आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत व्यापारी, नगरसेवक, नागरिकांनी विविध सूचना केल्या़ त्या सूचनांनुसार निर्णय होऊन अंतिम नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी नियोजनाबाबत काही सूचना केल्यास त्यांचा विचार करण्यात येईल. गणेशोत्सव कालावधीत नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे, असेही नगराध्यक्ष नलावडे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग