शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांच्या बॅटºया चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : सौरपथ दिव्यांच्या बॅटºया चोरणाºया कोल्हापुरातील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषणने सापळा रचून गजाआड केले. चोरलेल्या दोन बॅटºयांसह टेम्पोही उंबर्डे तिठ्यावर मंगळवारी रात्री ताब्यात घेतला.नवनाथ गोरख दोरकर (वय २५), ज्ञानदेव दीपक सोनवले (२४, दोघेही रा. मल्हारपेठ कळे, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी आचिर्णे कडूवाडी आणि उंबर्डेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : सौरपथ दिव्यांच्या बॅटºया चोरणाºया कोल्हापुरातील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषणने सापळा रचून गजाआड केले. चोरलेल्या दोन बॅटºयांसह टेम्पोही उंबर्डे तिठ्यावर मंगळवारी रात्री ताब्यात घेतला.नवनाथ गोरख दोरकर (वय २५), ज्ञानदेव दीपक सोनवले (२४, दोघेही रा. मल्हारपेठ कळे, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी आचिर्णे कडूवाडी आणि उंबर्डेतील चोरीची कबुली दिली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे वैभववाडीसह जिल्ह्यातील सौर पथदिव्यांच्या बॅटºयांच्या चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बॅटरी चोरट्यांचा टेम्पो उंबर्डे भुईबावडामार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक बापू खरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उंबर्डे तिठ्यावर मंगळवारी रात्री सापळा लावला होता. रात्री १२.३० च्या सुमारास एम. एच. ०९ सीयू-४०२९ या क्रमांकाचा छोटा मालवाहू टेम्पो स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला आढळून आला.कोल्हापूरकडे निघालेला टेम्पो थांबवून चौकशी केली असता त्या दोघांनी आठवडा बाजारात भाजीचा धंदा करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजीच्या क्रेट्स पाहताना क्रेट्समध्ये लपविलेल्या दोन बॅटºया सापडल्या. त्यामुळे नवनाथ दोरकर आणि ज्ञानदेव सोनवले यांच्यासह टेम्पो ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात आणला. त्यांची चौकशी करताना आचिर्णे कडूवाडी आणि उंबर्डेतील बॅटरी चोरीची त्यांनी कबुली दिली.ते दोघे उन्हाळ्यात दुचाकीवरून गावागावांत फिरून आइस्क्रीम विक्री करतात. तसेच भंगार खरेदी आणि सध्या आठवडा बाजारात भाजीचा धंदा करीत होते. आइस्क्रीम विक्रीच्या निमित्ताने गावागावात फिरताना दिवसा टेहळणी करून कोल्हापूरला जाताना रात्री सौर पथदिव्यांच्या बॅटºया चोरण्याचा उद्योग ते करीत असावेत. त्यामुळेच करुळ येथे पोलीस तपासणी नाका असल्याने त्यांनी भुईबावडा घाटमार्ग निवडला असण्याची शक्यता आहे.