शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:01 IST

कुडाळ : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील महामार्गावर व शहरात जाणाºया राज्य मार्गावर भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी टायर जाळल्यामुळे महामार्ग तसेच कुडाळ शहरात जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. आंदोलन करणाºया सुमारे ६७ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...

कुडाळ : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील महामार्गावर व शहरात जाणाºया राज्य मार्गावर भीमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी टायर जाळल्यामुळे महामार्ग तसेच कुडाळ शहरात जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. आंदोलन करणाºया सुमारे ६७ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कुडाळ वगळता जिल्ह्यात कुठेही बंदमुळे जाळपोळ अगर हिंसाचाराची कुठलीही घटना घडली नाही.कणकवली आणि सावंतवाडीमध्ये भीमसैनिकांनी एकत्र येत मोर्चा काढून प्रांताधिकाºयांना निवेदन सादर केले. कणकवलीतील मोर्चा दरम्यान, महामार्गावर ठाण मांडून भीमसैनिकांनी काही काळ तो रोखून धरला होता.कोरेगाव-भीमा येथील शौर्य दिनाला २०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन करायला आलेल्या लाखो अनुयायांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भीमसैनिकांच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्ग तसेच कुडाळ शहरातून वेंगुर्लेकडे जाणाºया कुडाळ शहरातील राज्य महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर जाळून भीमसैनिकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात विविध संघटना, मंडळांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग घेतला.सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला हार अर्पण करून पुतळ््यासमोरील मुख्य रस्त्यावर टायर जाळून भीमसैनिकांनी आंदोलन छेडले. त्यानंतर काही वेळातच येथील नवीन एसटी बस डेपोसमोरील मुंबई-गोवा महामार्गावरही रास्ता रोको करीत टायर जाळले. त्यामुळे महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोरेगाव-भीमा येथील घटनेचा व सरकारचा निषेध करणाºया घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलनाची माहिती मिळताच काही वेळातच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी जात आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये विजयकुमार जाधव, विद्याधर कुडाळकर, विलास कुडाळकर, आत्माराम कुडाळकर, सुधीर कुडाळकर, जनार्दन कुडाळकर, नीतेश कुडाळकर, भूषण कुडाळकर, सशील केळुस्कर, संदेश मालवणकर, किरण कुडाळकर, कृष्णा तेंडोलकर, सत्यवान साठे, विक्रम कुडाळकर, तुषार कुडाळकर, विष्णू जाधव, भूपेश चेंदवणकर, देवीदास जाधव, बाबली जाधव, रामा जाधव, संतोष जाधव, दीपक नाईक, अंकुश कदम, भूपेश चेंदवणकर, विष्णू तेंडोलकर, अर्जुन वरावडेकर, राजन आंबेरकर, अनिल नेरूरकर, विशाल नेरूरकर, सागर कदम, दीपक नाईक, हरी कदम, अंकिता कदम, भगवान कदम, दीपक अणावकर, हरिश्चंद्र्र कदम, जनार्दन वर्देकर, बाबी भडगावकर, रामचंद्र्र कदम, आनंद जाधव, अमर पावसकर, आनंद पेंडूरकर, नाना नेरूरकर, सरोज जाधव, विशाखा कुडाळकर, सरिता कदम यांच्यासह ६७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात महिलांचाही समावेश होता.जाळपोळ वगळता आंदोलन शांततेत पार पडले. संपूर्ण कुडाळ शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेष पोलीस पथक तसेच पोलीस अधिकारीही कुडाळमध्ये दाखल झाले होते.आंदोलनकर्त्यांचा पोलिसांना चकवाकुडाळमध्येच आंदोलनकर्त्यांनी दोन वेळा आंदोलन केले. मात्र, आंदोलनाची जराही कल्पना पोलिसांना लागू न देता पोलिसांना चकवा देत आंदोलन केले.