शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चोरीछुपे पुतळा दहन म्हणजे काँगे्रसचा भ्याडपणा

By admin | Updated: July 23, 2016 00:17 IST

यशवंत आठलेकर : ‘त्यांना’ अटक न केल्यास आंदोलन

दोडामार्ग : चोरीछुपे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे हे कृत्य म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांच्यात जर हिंमत होती, तर त्यांनी खुलेआम छातीठोकपणे हे कृत्य केले असते. त्यांच्या भ्याड कृत्याचा आम्ही निषेध करतो. तसेच पोलिसांनी हे दुष्कृत्य करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली नाही, तर आज, शनिवारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांनी दिला.काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची घटना कोनाळ येथे घडल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया दोडामार्ग तालुक्यात उमटल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे व तहसील कार्यालयात धडक देत असे कृत्य करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अटक न झाल्यास आजपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याबाबतची तक्रारही देण्यात आली. त्यानंतर येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात आला. यावेळी आठलेकर म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भ्याड वृत्ती आहे. चोरीछुपे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणे म्हणजे त्यांच्यातील भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांच्यात जर हिंमत असती, तर त्यांनी खुलेआमपणे हे कृत्य केले असते व फोटोसह वृत्तपत्रात बातम्या छापून आणल्या असत्या. मात्र तसे काही केले नाही. यावरून त्यांच्यात धमक नसल्याचे दिसून येते. जर या संबंधित काँगे्रस कार्यकर्त्यांना अटक झाली नाही, तर भाजपमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवाय त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष स्मिता आठलेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, नगरसेवक चेतन चव्हाण, सुधीर पनवेलकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)