चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांचा २४ रोजी मुंबई येथे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश होत आहे. यानिमित्त शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईला जाणार आहेत. पक्षप्रवेशानंतर कदम यांना लगेचच महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याने चिपळूणमध्ये उत्साह आहे. २००९ च्या निवडणुकीत माजी आमदार कदम यांना अपयश आल्यानंतर पक्षाने त्यांची फारशी दखल घेतली नव्हती. त्यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले. परंतु, त्यांच्यावर स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली नव्हती. कदम यांच्या समर्थकांची पक्षाच्या नेत्यांकडून कुचंबना होत होती. त्यांची कामेही केली जात नव्हती. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने कदम यांनी पक्षाशी फारकत घेऊन लोकसभा निवडणूक लढविली होती. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कदम यांचा शब्द प्रमाण मानला जातो. कदम समर्थक त्यांच्याशिवाय गावागावात गेले तर भार्इंचे काय? असा थेट प्रश्न विचारला जात असे. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांना याचा चांगला अनुभव आला. त्यामुळे कदम यांच्याशिवाय तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही, अशी भूमिका खताते यांनी मांडली. जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार दिलजमाई सुरु केली. माजी आमदार कदम यांची पक्षाला कशी गरज आहे हे वरिष्ठ नेत्यांना पटवून दिले. कदम नसतील तर विधानसभा निवडणुकीत पक्षाला लढणे अवघड आहे हे सांगितले. त्यामुळेच कदम यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय झाला. पक्षाचे मोठे पद देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचेही ठरले. परंतु, आजपर्यंत निष्ठेने पक्षाचे काम केल्याने आता आपल्याला दुसरे पद मिळावे अशी मागणी कदम यांनी केली. त्यानुसार कदम यांना एखाद्या महामंडळाची जबाबदारी देण्यात येणार आहे. माजी आमदार कदम पुन्हा पक्षात सक्रिय होत असल्याने तालुक्यात उत्साह आहे. आज मंगळवारी माजी आमदार कदम व त्यांचे काही सहकारी मुंबईला जात आहेत. तर उर्वरित पदाधिकारी व कार्यकर्ते उद्या दि. २३ रोजी मुंबईला जाणार आहेत. मुंबई येथील पक्षप्रवेश सोहळ््याला कोकणातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जात आहेत. चिपळुणचे माजी आमदार कदम यांना कोणते महामंडळ मिळणार याकडेही त्यांच्या समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)--राष्ट्रवादीतून सहा महिन्यांपूर्वी बाहेर पडलेले माजी आमदार रमेश कदम २४ रोजी मुंबईत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. या त्यांच्या पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या मतदारसंघात कोणताही धोका पत्करणार नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सध्या या मतदारसंघात कदम यांचे वर्चस्व असल्याने त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जात आहे.-चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कदम यांचा शब्द प्रमाण.-कदम यांच्या समर्थकांची पक्षाच्या नेत्यांकडून कुचंबणा-कदम यांना कोणते महामंडळ मिळणार याकडेही त्यांच्या समर्थकांच्या नजरा.
कदम गुरूवारी स्वगृही
By admin | Updated: July 22, 2014 22:14 IST