शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांसाठी आशादायी ठरलेला राज्याचा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 18, 2017 22:34 IST

रत्नागिरीकरांच्या प्रतिक्रिया : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद...

रत्नागिरी : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद, काजू, नारळावरील कर कमी अशा विविध तरतुदींचा कोकणला फायदा होईल. त्यामुळे शनिवारी मांडलेला राज्य अर्थसंकल्प कोकणसाठी फायदेशीर असल्याचा सूर रत्नागिरीकरांनी प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केला.सध्या राज्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केल्याचे अनेक रत्नागिरीकरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)जनतेच्या आशा पल्लवित करणारा अर्थसंकल्पशासनाच्या ध्येयधोरणाशी एकरूप होऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला. कोकण विकास महामंडळ निर्मिती नक्कीच स्वागतार्ह आहे. काजूसाठीची तरतूद कोकणचे अर्थकारण गतीमान करण्यास मदत होईल. जलयुक्त शिवारसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांनाच दिलासा देणारा आहे. आव्हानात्मक परिस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प कोकणाला न्याय देणारा असल्यामुळे जनता नक्कीच त्याचे स्वागत करेल. शामराव पेजे महामंडळाला केलेली तरतूद न्याय्य आहे. - अ‍ॅड. दीपक पटवर्धन,अध्यक्ष, स्वामी स्वरुपानंद पतसंस्था, रत्नागिरी.कोकण विकास महामंडळाची आवश्यकताआतापर्यंत कोकण विकास महामंडळाची घोषणा वारंवार झाली. परंतु, निधी अभावी महामंडळाची घोषणा हवेत विरली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महामंडळ नक्कीच फायदेशीर ठरेल. महामंडळाची घोषणा करून निधीची तरतूद करण्यात येणार असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील.- एम. ए. काजी, शेतकरी.ग्रेडिंगचा पर्याय कोकणासाठी अर्थसंकल्पातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आंबा उत्पादन खर्चिक असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काजूसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोकणाला अर्थाजन मिळवून देणाऱ्या आंब्याचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. यावर अर्थसंकल्पात तरतूद होणे महत्त्वाचे होते.- अविनाश प्रभूमहाजन, शेतकरीशेतकऱ्यांना फायदेशीर अर्थसंकल्पअर्थसंकल्प निश्चित उत्तम असून, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. काजू, नारळावरील कर कमी केल्यामुळे दरदेखील खाली येतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल. विमानसेवा महत्त्वाच्या प्रत्येक शहरासाठी आहे. जलवाहतुकीमध्ये कार्गोसेवा सुरू केली तर आंबा पाठविण्यासाठी त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.- आनंद देसाई,उद्योजक, पावसशेतकरी, सामान्यांचा विचार केलेला अर्थसंकल्पकोकणातील अतिशय महत्त्वाचे पीक असलेल्या कोकम (आमसुले) आणि नारळ यांना पूर्णपणे करसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात यावरील उद्योग वाढीस लागतील. बऱ्याच बाबतीत करमाफी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच विविध जीवनोपयोगी वस्तूंवरील करमाफीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. एकंदरीत, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा विचार केला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. - अ‍ॅड.कल्पलता भिडेबंदरे, मत्स्योत्पादनासाठी विशेष घोषणा नाही...सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी तरतूद केली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन विकास वाढणार आहे. तसेच महाराष्ट्रातील रेल्वे मार्गासाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे.यात कोकणसाठी किती, ते कळायला हवे. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. त्यात मुंबई उपकेंद्राला काही भाग मिळाल्यास कोकणला त्याचा फायदा होईल. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत, त्या दिसताना चांगल्या दिसत असल्या तरी त्याच्या शेतमालाच्या दृष्टीने मूळ उपाययोजनांसाठी आवश्यक तरतूद दिसत नाही. कोकणातील बंदरे तसेच मत्स्योत्पादनासाठी मात्र विशेष अशी कोणतीही घोषणा दिसत नाही. - प्रा. उदय बोडस