शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एस.टी. कामगार संघटनेचे मुंबई आझाद मैदानात 22 मार्च रोजी धरणे आंदोलन

By admin | Updated: March 15, 2017 20:32 IST

एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 22 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन

ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 15 - एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 22 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे.याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विविध प्रश्नांची सोडवणूक समयबध्द कालावधीत न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे आंदोलन करण्यात येणार आहे.एस.टी. कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा. 1 एफ्रील 2016 पासून 25 टक्के अंतरिम वाढ द्यावी. एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करण्यात यावे. सध्या चालक तसेच वाहक यांच्यावर बाह्य व्यक्तींचे हल्ले होत आहेत. याबाबत वेळीच दखल घेवून परीमाणककारक उपाय योजना करावी. अशा घटना टाळण्यासाठी संबधित गुन्हा अजामीनपात्र गुह्यात समाविष्ट करावा.ठाणे विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या रद्द कराव्यात. तसेच संघटनेच्या अन्य पदाधिकारी , कर्मचारी यांच्या आकसपूर्ण भावनेतून करलेल्या बदल्या रद्द कराव्यात.सन 2012-2016 या कामगार करारातील 12 कलमे वगळण्याच्या निर्णयांबाबत 24 एफ्रील 2016 रोजी शासन स्तरावरील बैठकीमध्ये झालेल्या निर्णया प्रमाणे कार्यवाही करावी. प्रत्यक्ष लागणारी धाव वेळ देण्यात यावी. चालक वाहकांची नियमबाह्य कामवाढ रद्द करण्यात यावी.अपेक्षित उत्पन्न असणाऱ्या व बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु कराव्यात. करार, कायदे ,परिपत्रक भंग करून आकसाने घेतलेले निर्णय रद्द करावेत. चालक, वाहकांच्या विश्रांती कक्षात आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. नवीन आगार निर्माण केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाला मंजूरी मिळत नाही. त्यामुळे तातडीने कर्मचारीवर्ग मंजूर करण्यात यावा. वाहकांच्या अपहार प्रकरणी तडजोड व बदलीबाबत प्रसारित करण्यात आलेले परिपत्रक 1/ 2017 व 2/ 2017 रद्द करण्यात यावे. तसेच प्रचलित नियमांचा भंग करून प्रसारित केलेली अन्य परिपत्रके रद्द करण्यात यावीत. चालक कम वाहक या पदामुळे एकाच कामगारावर दोन पदांचा भार येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला 500 रूपये भरुण वर्षभर मोफत पास देण्यात यावा. उभयपक्षी मान्य असलेली कॅशलेस योजना आणावी. यासह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही दिलीप साटम यांनी या प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.