शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एस.टी. च्या संपाने वाहतूक कोलमडली

By admin | Updated: December 17, 2015 23:08 IST

सावंतवाडीत काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात : ६0 टक्के परिणाम झाल्याची विभाग नियंत्रकांची माहिती

कणकवली : एस. टी. कर्मचाऱ्यांचा कामगार करार रद्द करून कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) ने गुरुवारी सुरु केलेल्या संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडीत संपकरी कर्मचारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. कणकवली एस. टी. आगारात सकाळी ६ वाजल्यापासून इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे व विभागीय सचिव एच. बी. रावराणे तसेच सभासदानी संपाला सुरुवात केली. प्रवाशांच्या सेवेसाठी एस. टी. प्रशासन सज्ज असल्याचा विभाग नियंत्रकानी केलेला दावा एकप्रकारे या संपामुळे फोल ठरल्याचे चित्र पहायला मिळाले. तर आजच्या संपाचा सिंधुदुर्ग विभागात वाहतुकीवर ६0 टक्के परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या गाड्या जावू शकल्या नाहीत, अशी माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली. इंटकने आपल्या मागण्यांसाठी १७ डिसेंबरपासून बेमुदत संप करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून संपाला सुरुवात झाली. सकाळी ७.३0 वाजेपर्यंत कणकवली एस टी. आगारातील वाहतूक बंद होती. येथील बसस्थानकातून गाड्या बाहेर नेण्यास चालक तसेच वाहकांना काही कर्मचाऱ्यांनी अटकाव केला. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तंग बनले होते. या दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांच्यासह पथक बसस्थानकात दाखल झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. इंटकच्या काही सदस्यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेले. तसेच चौकशी करून काही वेळाने सोडून दिले. दरम्यानच्या कालावधीत ८.४५ वाजण्याच्या सुमारास काही गाड्या बसस्थानकातून संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोडण्यात आल्या. मात्र, त्यानंतर येथील बसस्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद झाल्या. सकाळी १0 वाजल्यानंतर येथील बसस्थानकातुन एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, मिलिंद मेस्त्री तसेच अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात भेट दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले सावंतवाडीत आगारातून पणतुर्ली तसेच पणजीकडे जाणाऱ्या बसेस तालुका काँग्रेसने अडवल्या. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र, तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आगारांचे स्थानक प्रमुख श्याम चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी काँग्रेसने एकही एसटी बस आगाराच्या बाहेर जाऊ नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे बजावत रास्ता रोको केला. साडेपाच वाजता पणतुर्लीकडे जाणारी एसटी बस अडवल्यानंतर सर्वच एसटी बसेस जाग्यावर थांबून होत्या. अखेर काही वेळाने पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर काही बसेस सोडण्यात आल्या. या आंदोलनात तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, संदीप सुकी, रवींद्र मडगावकर, लवूू नाईक, विक्रांत आजगावकर, संतोष जोईल, मिलिंद फर्नांडिस, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, सुनिल केळूसकर आदींसह इंटकच्या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. देवगडमध्ये जोरदार घोषणाबाजी संपाच्या निमित्ताने देवगड एस.टी.स्थानकाबाहेर इंटक संघटनेच्यावतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ ओटवकर, सचिव लियातखान शेख, कार्याध्यक्ष चेतन वळंजू, बी. आर. बागवे, बी. एन. पोकळे, राजा राणे, ए. टी. पवार, व्ही. आर. सावंत, एस. के. पवार तसेच महिला कंडक्टर पी. यु. मुणगेकर, व्ही. व्ही. कदम, पी. एन. चव्हाण, पी. पी. जोईल तसेच मनसेचे ए. ए. परमाज, एस. सी. माळवदे आदी वाहक व चालक या बंदच्या हाकेत सहभागी झाले होते. मालवणात वेळापत्रक कोलमडले काँग्रेस प्रणीत एसटी वर्कर्स संघटना इंटक राज्यव्यापी संपाचा परिणाम मालवण तालुक्यातही जाणवला. आगारातून सुटणाऱ्या बसेसना अटकाव करत तसेच वाटेत अडविण्याचे प्रकार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी १० वाजेपर्यंत एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. सुटलेल्या गाड्याही अडविण्यात आल्याने प्रवाशांचे तसेच विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल झाले. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्तेही कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी अटकाव करत कोणत्याही बसेसना अडविण्याचे प्रकार होता नये अशी भूमिका घेतली. त्यानंतर बससेवा सुरळीत सुरु झाली होती. कुडाळात १ लाखांचे नुकसान कुडाळ डेपोतील इंटक संघटनेच्या एस.टी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे तीन हजार किलोमीटरवर धावणाऱ्या एस.टी. च्या कुडाळ आगारातील ९0 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे एस.टी.प्रशासनाला १ लाखाच्या नुकसानीस सामोरे जावे लागले. तसेच एस.टी. बसेस अडविण्यात येऊ नयेत याकरीता कुडाळ पोलिसांनी आंदोलनकर्त्या २0 कामगारांना ताब्यात घेतले व काही कालावधीनंतर सोडून दिले. (वार्ताहर/प्रतिनिधी) श्याम चव्हाण : चालक, वाहक मिळतील तशा गाड्या सोडल्या सावंतवाडीत पहाटेच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत एसटी सेवा पूर्णत: बंद होती. मात्र, नंतर आम्ही चालक वाहक उपलब्ध होतील तशा एसटी बसेस सोडल्या, असे स्थानकप्रमुख श्याम चव्हाण यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीत इंटक काँग्रेसने पुकारलेले आंदोलन यशस्वी झाले असून कर्मचाऱ्यांची वेतन वाढ झाली पाहिजे. त्यासाठी इंटकच्या या मागणीला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे, असे काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तिकीटाचे पैसे परत कोल्हापूर परिसरात संपाला हिंसक वळण लागल्याने सिंधुदुर्गातून बाहेरच्या जिल्ह्यात एसटी घेऊन जाण्यास अनेक चालकांनी नकार दिला. कणकवली आगारात अनेक गाड्या जमा करण्यात आल्या. पणजी- सांगोला तसेच अन्य गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडी पुढे जावू शकणार नसल्याने उर्वरित तिकीटाचे पैसे परत देण्यात आले. बंदमध्ये देवगड आगारातील ८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तालुक्यातील महत्वाची ओळखली जाणारी एसटी प्रवास वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. तसेच मनसे संघटनेने देखील इंटकच्या बंदला पाठींबा दर्शविला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंटकच्या कार्यकर्त्यांना देवगड पोलिसांनी दोन तास ताब्यात घेऊन सोडले.