शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद 

By अनंत खं.जाधव | Updated: April 4, 2023 16:19 IST

सावंतवाडी : सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपने ...

सावंतवाडी : सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपने आपल्या कार्यालयाकडून तर शिवसेना शिंदे गटाने आपली यात्रा केसरकर यांच्या कार्यालयाकडून सुरू केली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते शिवरामराजेच्या पुतळ्याजवळ एकत्र आले आणि शहरातून रॅली काढण्यात आली.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना शिंदे गट हे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. सावंतवाडीतही गौरव यात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रथम शिवराम राजेच्या पुतळ्यास माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पहार घातल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली.

त्यानंतर ही रॅली मोती तलावाकडून मिलाग्रीस हायस्कूल, सालईवाडा मार्गे, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, उभाबाजार, चितारअळी त्यानंतर नारायण मंदिर जवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी वीर सावरकरांची हुबेहूब प्रतिमा लक्षवेधी ठरत होती. या रॅलीत ढोल पथक, आम्ही सावरकर असे फलक, मी सावरकर आशयाच्या टोप्या घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप झाल्यानंतर अनेकांनी आपले विचार मांडले.या रॅलीत माजी आमदार राजन तेली, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शिवसेना शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जास्त होते. त्यामुळे या रॅलीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा रंगली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग