शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फिशिंग कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद, सावंतवाडी नगरपालिकेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:31 IST

सावंतवाडी नगरपालिकेने पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते.

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेने पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. त्याला  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम क्रमांक दानिश राजगुरू याने पटकावला. तर द्वितीय क्रमांक विराज सावंत, तृतीय क्रमांक रंगनाथ तुळसकर यांनी पटकावला आहे. या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी स्पर्धकांना खास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, नगरसेविका दीपाली सावंत, भारती मोरे, दीपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, महेश सुकी आदी उपस्थित होते.शनिवारी सकाळी येथील मोती तलावात फिशिंग कॉम्पिटिशन पार पडले. यामध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अनेकांनी फिशिंगचा आनंद लुटला. सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. अनेक स्पर्धकांनी मोती तलावातून मासे काढून ते परीक्षकांना दाखवले. त्यानंतर ते तलावात सोडले. वेगवेगळ््या  पध्दतीने मासे काढण्यात येत होते. त्यांची लांबी मोजून त्यावर गुण ठरविण्यात येत होते.सकाळी ८ वाजता सुरू झालेली स्पर्धा दहा वाजेपर्यंत चालली. त्यानंतर मोती तलावाच्या काठावरच स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतून तीन क्रमांक काढण्यात आले. यात प्रथम क्रमांक दानिश राजगुरू याने पटकावला. तर व्दितीय क्रमांक विराज सावंत व तृतीय क्रमाक रंगनाथ तुळसकर यांनी पटकावला आहे. सर्वांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्षांसह मुख्याधिकारी व नगरसेवक उपस्थीत होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर, देविदास आडारकर, बाबा शेख, महेश कुडतरकर, भाऊ भिसे, तानाजी पालव, मनोज शिरोडकर, निलेश तळवणेकर आदींनी मेहनत घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग