शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव उत्साहात

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

हजारो भाविकांनी घेतले दर्शन : उत्कृष्ट नियोजनाचे भाविकांतून समाधान

रामचंद्र कुडाळकर - तळवडे संपूर्ण राज्यभर प्रसिध्द असलेल्या, दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव गुरुवारी थाटात संपन्न झाला. मुंबई, गोवा, कर्नाटक व इतर विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो भक्तगणांनी जत्रोत्सवात देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीपेक्षाही भाविकांची संख्या यंदा वाढली असून, प्रशासनाच्या सोयीसुविधांमुळे यंदाच्या जत्रोत्सवात कसलीही अडचण आली नाही. उत्कृष्ट नियोजनामुळे यंदा देवीचे दर्शन व वाहनांची कोंडीही जाणवली नसल्याने भाविकांतून नियोजन व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी देवीच्या पाषाणावर परंपरेप्रमाणे अभिषेक करण्यात आला. शास्त्रोक्त पध्दतीने पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्त्रालंकारांनी देवीची मूर्ती सजविण्यात आली. परंपरेनुसार धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तगणांना सोडण्यात आले. सकाळी सहा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती. हळूहळू ही भक्तांची संख्या वाढू लागल्याने नियोजित करण्यात आलेल्या रांगामधून भाविकांना दर्शनासठी सोडण्यात आले. संपूर्ण मंदिराभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. जत्रोत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ेजत्रोत्सवात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दर्शनाकरिता उत्कृष्ट नियोजनमाऊलीच्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंडपही उभारण्यात आला होता. तसेच महिला भाविकांसह आबालवृध्दांनाही देवीचे दर्शन व्हावे, यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांच्या मदतीने नियोजनबध्द रांगा तयार करण्यात आल्या होत्या.अद्वितीय लोटांगण सोहळा‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून विशेष प्रसिध्द असलेल्या सोनुर्ली जत्रोत्सवात शेकडो भाविकांनी देवीच्या चरणी लोटांगण घालून नवसफेड केली. सिंधुदुर्गातील भक्तांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांनीही यावेळी लोटांगण घालण्यासाठी गर्दी केली होती.