शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राडा प्रकरणात आणखी काहींचा समावेश

By admin | Updated: October 2, 2016 00:16 IST

बांदा येथे संपत्तीतून वाद : एकोणीस जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सावंतवाडी : संपत्तीच्या वादातून बांदा शहरातील कट्टा कार्नर येथे झालेल्या राड्यातील संशयित आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही संशयित आरोपी असून निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अब्दुलकादर खान याचे वर्तन तसेच आरोपींनी वापरलेली हत्यारे कुठून आणली, याची माहिती घ्यायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. बांदा कट्टा कॉर्नर येथे दोन गटांत धारदार शस्त्रांसह तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. पोलिसांनी आसिफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपींना शनिवारी सावंतवाडीतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी बाजू मांडताना घटनेची माहिती न्यायालयाला दिली. तसेच संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यात आरोपी मुंबईचे असून, त्यांनी आणलेली हत्यारे कुठून आणली तसेच यामध्ये अन्य काही आरोपी आहेत का, याचीही चौकशी करणे बाकी आहे, असे सांगितले. तसेच मुख्य संशयित अब्दुलकादर खान हा मुंबई येथे सहाय्यक पोलिस आयुक्त होता. त्यामुळे त्याच्या वर्तनाची चौकशी करणे बाकी असल्याने पोलिस कोठडी हवी असल्याची मागणी केली. मात्र, याला आरोपींचे वकील अ‍ॅड. अजित भणगे यांनी विरोध केला. सर्व आरोपी हजर झाले आहेत. हत्यारेही जमा केली असल्याने पोलिस कोठडी देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. बापू गव्हाणकर यांनीही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने आपले म्हणणे लेखी द्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)