शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नौकाधारकांमध्ये समाधान : सागरी पर्यटन हंगामाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:39 IST

सागरी पर्यटन हंगामाचा रविवार १ सप्टेंबरपासून श्रीगणेशा होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथील बंदरातील ६३ जलप्रवासी वाहतूक नौकाधारकांना प्रवासी वाहतुकीचे परवाने वितरीत केले.

ठळक मुद्दे नौकाधारकांमध्ये समाधान : सागरी पर्यटन हंगामाचा प्रारंभवर्षभरात अजून १५0 अधिकृत परवान्यांचे नियोजनमालवण येथे प्रवासी वाहतुकीचे परवाने वितरीत

मालवण : सागरी पर्यटन हंगामाचा रविवार १ सप्टेंबरपासून श्रीगणेशा होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथील बंदरातील ६३ जलप्रवासी वाहतूक नौकाधारकांना प्रवासी वाहतुकीचे परवाने वितरीत केले. येत्या वर्षभरात आणखी १०० ते १५० अधिकृत जलप्रवासी वाहतूक परवाने काढले जावेत यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी आतापर्यत सागरी  पर्यटन हंगामाच्या सुरूवातीस प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांना एकदाही परवाना मिळाला नव्हता. मात्र, यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या आदल्या दिवशी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या माध्यमातून जलप्रवासी नौकांना परवाना प्राप्त झाल्याने प्रवासी होडी नौकाधारकांच्यावतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे सांगितले.परवाना वितरण कार्यक्रमास बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, दिलीप आचरेकर, बाबा सरकारे, राजू पराडकर, दादा जोशी, स्वप्नील आचरेकर, आप्पा मोरजकर, बाळा तारी, विनायक तारी, काका जोशी, प्रसाद सरकारे, कर्मचारी शंकर नार्वेकर, एस. आर. मिठबावकर, एस. एच. कदम, ए. एस. गावकर आदी उपस्थित होते.कॅप्टन नाईक म्हणाले, तालुक्यातील सर्व जलक्रीडा, जलप्रवासी वाहतूक नौकाधारक, स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांची बैठक २० जूनला घेण्यात आली होती. या बैठकीत जलप्रवासी आयव्ही अ‍ॅक्ट १९१७ अंतर्गत नियमित करून अनधिकृत जलप्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची सूचना सर्वांना देण्यात आली होती.

सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात केवळ पाच प्रवासी वाहतूक परवाने देण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना आयव्ही अ‍ॅॅक्टअंतर्गत नौका वाहतूक करण्यासाठी नौकांची असणारी कार्यवाही समजावून सांगण्यात आली होती. त्यानुसार येथील जलप्रवासी नौकाधारकांनी परवान्यासाठी ६३ प्रस्ताव सादर केले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग