ओरोस : सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित केलेल्या एकता दौड कार्यक्रमाला जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या दौड कार्यक्रमाला कर्मचारी, अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सिंधुदुर्गनगरी येथे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड हा कार्यक्रम आयोजित केला होता. या दौड कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने केला. यावेळी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दौडची राष्ट्रीय शपथ देण्यात आली.पोलीस परेड ग्राऊंड ते ओरोस फाटा व पुन्हा ओरोस फाटा ते पोलीस ग्राऊंड असे राष्ट्रीय एकता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रीय एकता दौड दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.एकता दौडचे बक्षीस वितरण ओरोस फाटा येथे ई. रविंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये पोलीस महिला शितल नांदोसकर, प्रणाली जाधव, तृप्ती कुळये यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पुरूष गटात पोलीस कर्मचारी सुरेश गवस, प्रवीण खरात, गजानन देसाई यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. विजेत्यांना ई. रविंद्रन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, कुडाळचे उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, विठ्ठल इनामदार, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, तहसीलदार शिवराज देशमुख, कसाल मंडळ अधिकारी मंगेश यादव, नायब तहसीलदार गावीत उपस्थितहोते. (वार्ताहर)
एकता दौडला प्रतिसाद
By admin | Updated: October 31, 2014 23:31 IST