शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पाकिस्तानी जहाजाने उडवली सुरक्षा यंत्रणेची झोप-महाकाय जहाजाचे रहस्य गुलदस्त्यात : सुरक्षा यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:25 IST

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती (वेंगुर्ले) ते देवबाग (मालवण) येथील समुद्राच्या दरम्यान मंगळवारी रात्री महाकाय जहाज खोल समुद्रात किनाऱ्याच्या दिशेने सरकत असल्याने किनारपट्टीवर

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरीलपोलिसांची जहाजाच्या हालचालीवर करडी नजर : तटरक्षक दलाकडून हेलिकॉप्टरचा आधार

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती (वेंगुर्ले) ते देवबाग (मालवण) येथील समुद्राच्या दरम्यान मंगळवारी रात्री महाकाय जहाज खोल समुद्रात किनाऱ्याच्या दिशेने सरकत असल्याने किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली. देवबाग येथील स्थानिक मच्छिमारांनी पोलीस यंत्रणेला माहिती दिल्यानंतर महाकाय जहाजाबाबत पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सुरक्षा यंत्रणेला ‘अलर्ट’ केले आहे.

समुद्र खवळलेला असल्याने ‘त्या’ संशयास्पद जहाजापर्यंत पोहचण्यात पोलीस यंत्रणेसह तटरक्षक दलालाही नैसर्गिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ते जहाज नेमके कशासाठी थांबले की बंद पडले याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होत नसल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

दरम्यान, ते संशयास्पद जहाज पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आल्याने सुरक्षा यंत्रणेची दमछाक झाली आहे. ते जहाज पाकिस्तानहून सिंगापूरला जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस, सागरी पोलीस व भारतीय तटरक्षक दल अधिक दक्ष बनले आहे. देवबागाच्या दिशेने ते जहाज मार्गक्रमण करत असल्याने देवबागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, असे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी सांगितले तर निवती पोलीस ठाण्यातूनही त्या जहाजावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. शिवाय पोलीस अधीक्षक स्वत: या जहाजाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी हद्दीत मालवण ते वेंगुर्ले किनारपट्टीच्या दरम्यान खोल समुद्रात मंगळवारी सायंकाळीपासून उभ्या स्थितीत दिसू लागल्याने मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली. मच्छिमारांनी त्या जहाजाची माहिती रात्री पोलीस यंत्रणेला दिली. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांना कल्पना दिली. जिल्हा पोलीस यंत्रणेने तटरक्षक दल आणि इतर यंत्रणेशी संपर्क साधून जहाजाचा शोध घेतला. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने त्या जहाजापर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत. संशयास्पद जहाजाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून जहाजाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. २४ तास उलटले ; जहाज मात्र ‘जैसे थे’सुरक्षा यंत्रणेच्या माहितीनुसार समुद्रात उभे असलेले जहाज पाकिस्तानी आहे. त्यामुळे त्या जहाजाबाबत नेमकी आणि विस्तृत माहिती मिळणे आव्हानात्मक बनले आहे. २४ तास उलटले तरी जहाज देवबाग व निवती दिपगृहासमोरील खोल समुद्रात ‘जैसे थे’च अडकून पडले आहे. तटरक्षक दलाकडून हॅॅलिकॉप्टरच्या साहाय्याने त्या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ते जहाज का थांबले ? काही बिघाड झाला आहे का ? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती.पोलीस बंदोबस्त अन करडी नजरपाकिस्तानी जहाजाबाबत पोलीस अधीक्षक गेडाम यांनी मंगळवारी रात्रीपासून जातिनिशी लक्ष दिला आहे. त्यामुळे देवबाग येथे मालवण पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर निवती पोलीस ठाण्यातूनही त्या जहाजाच्या हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे. निवती पोलिसांकडून वायरलेसवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून हवामान खराब असल्याने त्या जहाजावरून प्रतिसाद मिळत नाहीय, अशी माहिती उपलब्ध होतेय.घबराटीचे वातावरण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाकिस्तानी जहाज नेमके कशासाठी थांबले आहे ? की तांत्रिक बिघडामुळे अडकले आहे ? याची माहिती उपलब्ध होत नसल्याने किनारपट्टी घबराटीचे वातावरण आहे. जहाज किनाºयावर अधिक सरकल्यास खडकाळ भागाचा धोका अधिक असल्याने मच्छिमारही सतर्क झाले आहेत.

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाboat clubबोट क्लबPoliceपोलिस