शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

चला हवा येऊ द्या; ...म्हणून कॉमेडी किंग भाऊ कदमला देवेंद्र फडणवीसांचा फोन            

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 19:30 IST

''चला हवा येऊ द्या''बद्दल सर्वच राजकीय पक्षांत कुतूहल असते.

 - अनंत जाधवसावंतवाडी : ''चला हवा येऊ द्या''बद्दल सर्वच राजकीय पक्षांत कुतूहल असते. एखाद्या राजकीय नेत्यावर विनोद केला तर ते त्याला खास अशी दाद देतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मी पुन्हा येईन, असे सांगून आम्हाला एक नवीन टॅगलाइन दिली आहे. त्यावर केलेल्या विनोदाला फडणवीस यांनी खास कलाकार भाऊ कदमचे फोन करून अभिनंदन केले आहे, अशी माहिती चला हवा येऊ द्याचे प्रमुख कलाकार अभिनेता डॉ. निलेश साबळे यांनी दिली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे निमंत्रण दिले आहे. पण मातोश्रीवर जायचे की वर्षा वर हे अद्याप ठरले नसल्याचेही साबळे यांनी सांगितले.चला हवा येऊ द्याची टीम शनिवारी मुंबईहून गोव्याकडे जात असताना काही काळ त्यांनी कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील 'रात्रीस खेळ चाले'च्या सेटवर चित्रीकरण केले होते. त्यावेळी साबळे यांनी लोकमतशी खास संवाद साधला. चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम संपूर्ण जगात चांगलाच नावारूपास आला आहे. मध्यतंरी निवडणुकीच्या व नंतर सरकार स्थापन करण्याच्या धगाधगीच्या जीवनातही अनेक जण चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघत होते. यांची जराही टीआरपी कमी झाला नव्हता.अनेक जण दिवसभर बातम्या बघत असत, पण नंतर चला हवा येऊ द्या बघितल्यानंतर त्यांना थोडसे हायसे वाटत होते. आम्ही अनेक राजकीय नेत्यांवर विनोद करत असतो. पण आतापर्यंत असे कधीही झाले नाही की एखाद्या राजकीय नेत्याने त्यावर आक्षेप घेतला. अनेक जणांनी तर आम्हाला फोन करू दाद दिली आहे. महाराष्ट्रातील हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार हे आमच्या मालिकेच्या सेटवर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात.अमिताभ बच्चन असो अगर शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान यांनी तर एक नव्हे तर दोनदा आमच्या सेटवर येऊन आमच्या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.अनेक वेळा मराठीच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट अभिनेते कशासाठी असा प्रश्न येतो. पण आम्ही यावर कोणतेही भाष्य करत नाही. मराठीच्या सेटवर हिंदीचे कलाकार येतात म्हणजे नक्कीच आमच्यात काही तरी वेगळेपण आहे, हेच यातून दिसून येते, असेही साबळे यांनी सांगितले. अभिनेत्याप्रमाणेच राजकीय नेते ही आमचा कार्यक्रम आवर्जून बघतात.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मी चला हवा येऊ द्या कार्यक्रम बघितल्याशिवाय झोपतच नाही, असे आम्हाला एका कार्यक्रमात सांगितले होते. तसेच आमच्यातील कलाकारांनाही त्यांनी तुम्ही केलेले विनोद कसे चांगले आहेत, हे पटवूनही दिले होते, असे ही साबळे यांनी स्पष्ट केले. तसेच फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, असे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. त्यावर अभिनेता भाऊ कदम यांंनी केलेला विनोद फडणवीस यांना प्रचंड आवडला. त्यांचे फोन करून अभिनंदन केल्याचे साबळे यांनी सांगितले.नव्या मुख्यमंत्र्यांनी चला हवा येऊ द्याच्या टीमला भेटण्यासाठी बोलावले आहे. पण कुठे भेटायचे हे त्यांनी अद्याप सांगितले. नाही तेही आमचा कार्यक्रम टीव्ही किंवा यू ट्युबवर बघतात, असे त्यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सगळे कलाकार हे प्रथमच भेटणार असून, वर्षा की मातोश्री हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.चला हवा येऊ द्या वर आता चित्रपट येणारचला हवा येऊ द्या वर चित्रपट काढण्याबाबत आमचा विचार सुरू असून, आम्ही त्याबाबतची पटकथाही निमिर्त्यांना दिली आहे. मात्र चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद होणार नाही, असे साबळे यांनी सांगितले. तसेच चला हवा येऊ द्या हा चित्रपट पूर्णत: विनोदी असणार आहे, असेही साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण कुठे होणार हे निश्चित ठरले नाही. पण आमचे कोकणला प्राधान्य राहणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.