शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

....तर जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळा होणार बंद?

By admin | Updated: May 8, 2015 00:14 IST

जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ

रहिम दलाल - रत्नागिरी  विद्यार्थीसंख्या १० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी ती शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. ग्रामीण भागातही खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.तसेच नोकरी, धंद्यानिमित्त लोक शहराकडे धाव घेत असतानाच लोकसंख्येचे होणारे कमी प्रमाण, अशी विविध कारणे पटसंख्या कमी होण्यामागे आहेत. तरीही जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जाचाही विचार केला जात आहे. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ शाळा आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होतील.नवीन शाळा, तुकड्या सुरु करणे, मंजूर करणे व त्या टिकविणेबाबतचे निकष ठरविण्याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १ ते १० विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.प्रधान सचिवांच्या या शिफारशींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्या असलेल्या ४७४ शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. त्या शाळांमधील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल. तसेच २६ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ ते ८वीपर्यंतच्या शाळाही बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये २५६२ मराठी माध्यम आणि १७१ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास उर्दूच्या निम्म्यापेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्यानंतर या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन कोठे करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.