शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सावंतवाडीत शिवप्रेमींचा उत्साह

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

शिवजयंती साजरी : घोड्यांसह ढोलताशांच्या गजरात शहरातून रॅली

सावंतवाडी : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ च्या घोषात शिवजयंतीनिमित्त सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन गुरूवारी भव्य शिवरॅली शहरातून काढली. या रॅलीचे उद्घाटन राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य शिवरॅलीमध्ये सावंतवाडी शहरातील सर्व रिक्षा चालकांनीही सहभाग घेतल्याने अवघ्या दीड किलोमीटर अंतराची ही रॅली सावंतवाडी शहरातून काढण्यात आली. संस्थानकालीन राजवाडा येथे सावंतवाडी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी गुरूवारी सकाळी १० वाजता एकत्र जमले. सोबतच घोडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत कलाकार, सर्व शिवप्रेमींच्या डोक्यावर भगवे फेटे, ढोल ताशांच्या गजरात सावंतवाडी राजवाडा येथून भव्य अशी शिवरॅली काढण्यात आली. खासकीलवाडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राजेसाहेब खेमसावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. खासकीलवाडा, मोती तलाव तीन मुशी येथून सावंतवाडी बाजारपेठ शिवाजी चौक येथून उभाबाजार मार्गे चितारआळी, एसटी बसस्थानक मार्गे गवळीतिठा येथे या रॅलीची सांगता झाली. प्रत्येक चौकामध्ये लावण्यात आलेले जुने भगवे काढून नवीन भगवे लावण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव आदी घोषणांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात काढलेल्या या रॅलीत युवकांसह तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शिवाजीच्या वेशातील मंगेश गावडे व छोट्या मावळ्याच्या वेशातील फ्रे ड डिसिल्वा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, वसंत केसरकर, मंगेश तळवणेकर, सुरेश भोगटे, राजू पनवेलकर, अमेय तेंडोलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू नाईक, नगरसेवक देवेंद्र टेमकर, दिलीप भालेकर, रवींद्र म्हापसेकर, गुरू मठकर, एकनाथ नारोजी, शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार, महेश पांचाळ, संतोष गोवेकर, साईनाथ गोवेकर, शैलेश तावडे, विलास सावंत, नाना भराडी, मनसे शहराध्यक्ष सागर कांदळगावकर, प्रशांत मोरजकर, भाजप शहराध्यक्ष सिध्दार्थ भांबुरे, आनंद नेवगी, विराग मडकईकर, मंदार पिळणकर, राष्ट्रवादीचे विजय कदम, अशोक पवार, राजू पनवेलकर, सचिन घाडी, अरुण घाडी, संजू शिरोडकर व शहरातील सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शिवरॅलीची सांगता वंदे मातरमने झाली. (वार्ताहर)सर्वपक्षीय एकत्रया रॅलीमध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे या सर्व पक्षातील नेते व पदाधिकारी, शहरातील सुमारे शंभर रिक्षा यांच्यासह सुमारे १००० शिवप्रेमींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.