शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्गचा सर्वांगिण विकास -  केसरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 20:15 IST

कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला. 

सिंधुदुर्गनगरी दि. 15 - कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन या त्रिसुत्रीवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.  भारतीय स्वातंत्रयदिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्यजारोहण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरण व्हावे, पर्यटन विकासाला चालना मिळावी, पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास व्हावा, श्री भात पध्दतीचा विस्तार होऊन भात शेती किफायतशीर व्हावी या अनुषंगाने चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना सिंधुदुर्गात राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन केसरकर  म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करुन आर्थिक जीवनमान उंचावल्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटन व सिंधुदुर्ग यांच नांत अधिक दृढ आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात प्रगतीचा चढता आलेख ठेवला आहे.  सिंधुदुर्गातील शेतकरी पारंपरिक भात शेतीला फाटा देऊन आता श्री पध्दतीने भात लागवड करण्याकडे मोठ्‌या प्रमाणात आकर्षित झाला आहे. गतवर्षी श्री पध्दतीने भात लागवडीचे एक हजार हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात होते. यंदाच्या वर्षी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड झाली असल्याचे सांगून केसरकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात फळझाड लागवडीचं प्रमाण अत्यल्प होत. तथापि जिल्हा प्रशासन, कृषी व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नाव्दारे यंदाच्या वर्षी आठ हजार 500 हेक्टर क्षेत्रावर फळझाड लागवड होत आहे.   कृषी सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षात सिंधुदर्गात 16 हजार 375 वनराई / कच्चे बंधारे धडक कार्यक्रमाव्दारे बांधण्यात आल्याचे सांगुन पालकमंत्री म्हणाले की, कोल्हापूर पध्दतीच्या 29 बंधा-याची कामे पुर्ण करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील 308 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली. स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा तसेच या महिन्यात येणा-या गणशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.   मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास आमदार वैभव नाईक, प्रभाकर सावंत जिल्हास्तरीय अधिकारी, नागरिक, मुले-मुली उपस्थित होती. ल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते सकाळी ठीक 08.30 वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.