शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरीत धडाडली जिजाऊंच्या लेकींची तोफ

By admin | Updated: October 24, 2016 00:09 IST

गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे

सिंधुदुर्गनगरी : कोपर्डीत १६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेला अत्याचार, दोषींना शिक्षा ठोठावण्यात होत असलेला वेळकाढूपणा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण नसल्याने मराठा समाजातील मुलांची होणारी होरपळ या सगळ्या संतापाला रविवारी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाने वाट करून दिली. सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे सिंधुदुगनगरीच्या पाच रणरागिणींच्या वक्तृत्वाच्या तोफा धडाडल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी सिंधुदुर्गनगरीत निघाला. ‘न भूतो, न भविष्यती’ निघालेल्या अशा या मोर्चाचे नेतृत्व केले सिंधुदुर्गच्या रणरागिणींनी. सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्गनगरीत दुपारी १२.३० वाजता या सिंधुदुर्गच्या पाच कन्यांनी आपल्या भाषणांतून मोर्चामागील उद्देश विशद केला. ऋतुजा मर्गज म्हणाली, कोपर्डीतील बहिणीच्या अखेरच्या श्वासाने आम्ही बांधलो गेलो. क्रांतीसाठी रक्ताचा इतिहास लागतो, असे म्हणतात. अशा किती बहिणी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या अपेक्षित आहे. मराठा समाज आतापर्यंत देणारा होता. आता मागणारा झालाय, पण ओरबाडणारा नाही. म्हणूनच हा मूक मोर्चा. गुणवत्ता नसेल तर खुशाल शिक्षणाची दारे बंद करा, पण आरक्षण नाही म्हणून आता माघार नाही. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर तीव्र कारवाई झालीच पाहिजे. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे. रूपाली परब म्हणाली, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. रयतेचे राज्य स्थापन करून माणुसकीचा, समानतेचा भगवा झेंडा फडकावला त्या महाराष्ट्रात आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झालीच कशी? कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशांचा शिवरायांनी कडेलोट, शिरच्छेद केला असता. आता त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. आता रडायचं नाही, लढायचं. मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं. जिगिशा सावंत म्हणाली, लाखोंचे विक्रम मोडत जिल्ह्याजिल्ह्यांत निघणारे मराठ्यांचे मोर्चे कोणाला भीती घालण्यासाठी नाहीत. मोर्चात चालणारी माणसं फक्त शेतकऱ्यांची कोंडी फोडू मागताहेत. १६ वर्षांच्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या म्हणतोय आणि प्रत्येक गोष्टीत डावलल्या जाणाऱ्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतोय. रसिका राणे म्हणाली, कोपर्डीच्या मुलीने आपल्याला एकत्र आणले. अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द व्हावा, अशी मागणी नाही; पण त्याचा गैरवापर होता कामा नये, यासाठी तत्काळ सुधारणा करा. हा मूक मोर्चा असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता आहे तोपर्यंतच काय तो निर्णय घ्या. नाहीतर एकदा का वादळ पेटलं तर कळायचं नाही काय होईल ते. गायत्री सावंत म्हणाली, एकमेकांशी खूप भांडलो, आपसात खूप लढलो, अनेकांनी वापर केला, अनेकांचा प्रचार केला, अनेकांची ढाल झाली, अनेकांच्या मागे धावलो. आता हे घडणार नाही. मराठा बळी पडणार नाही. शब्दांना आग आली आहे. जिजाऊंची लेक जागी झाली आहे. आता मराठाच मराठ्यांना वाचवेल, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल, दाखवू पुन्हा जगाला, काय असतो धाक मराठा, एक मराठा : लाख मराठा. सिंधुदुर्गच्या या रणरागिणी कन्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन तसेच सूत्रसंचालनही समिधा पाताडे हिने केले. राष्ट्रगीताने या मूक मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)