शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 9, 2024 13:20 IST

एक जण पोहत किनाऱ्यावर पोहचला, स्थानिक तसेच पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू

संदीप बोडवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण: तळाशील खाडी किनारी पात (छोटी होडी) बुडाली असून होडीतील एक जण पोहत तळाशील किनाऱ्यावर पोचला. मात्र अन्य दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले होते. यापैकी एकाचा मृतदेह रविवारी सकाळी सापडून आला. शनिवार ८ जून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या वाऱ्या पावसात होडी नदीपात्रात (खाडी) उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान बेपत्ता एका मच्छिमारांचा शोध सूरू आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या महिनानुसार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), मुलगा लावण्य किशोर चोडणेकर  (वय १४), दोन्ही रा. तळाशील मालवण तसेच धोंडीराज परब (वय ५५) मूळ रा. तारकर्ली हे तिघे ८ जून रोजी सायंकाळी उशिरा तळाशील खाडीमध्ये पात (छोटी होडी) घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. सर्जेकोट तळाशील समोर समुद्रात होडी असताना असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे होडी नदीत (खाडीत) उलटल्याने तिघेही जण पाण्यामध्ये पडले.

लावण्य चोडणेकर याने गाठला किनारा

होडीतून पाण्यात पडलेल्या तिघांपैकी लावण्य किशोर चोडणेकर या मुलाने पोहत पोहत तळाशील किनारा गाठला. आपल्या सोबत असलेले वडील किशोर चोडणेकर व धोंडीराज परब हे दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाल्याचे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सांगितले.

स्थानिक तसेच पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू

पाण्यात बुडालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सूरू होता  रात्रीचा अंधार तसेच पाऊस असल्याकारणाने शोध कार्यात अडथळे येत होते.

एका मच्छीमारांचा मृतदेह सापडला

रविवारी सकाळी बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमारांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी शोध पथकास होडी बुडालेल्या ठिकाणी जाळ्याच्या दोरात अडकलेल्या अवस्थेत तारकर्ली येथील धोंडीराज परब यांचा मृतदेह आढळून आला.  

एका बेपत्ताचे शोधकार्य सुरू...दरम्यान किशोर चोडणेकर यांचा अद्यापही शोध लागला नव्हता. शोध पथकाच्या  सहभागतून सकाळ पासून  शोध मोहीम सूरू होती. या शोध  पथकात  सुजित मोंडकर, वैभव खोबरेकर, समीर गोवेकर, प्रसाद मयेकर, जगदीश तोडणकर, भूपेंद्र तोडणकर, वसंत गावकर, व अन्य तळाशिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धोंडीराज परब यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मालवण पोलिस निरीक्षक  प्रवीण कोल्हे यांनी दिली.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराDeathमृत्यू